नृत्ये यांमुळे ‘कलांगण’ खुलले.
By Admin | Updated: May 4, 2015 01:23 IST2015-05-04T01:23:08+5:302015-05-04T01:23:35+5:30
नृत्ये यांमुळे ‘कलांगण’ खुलले.

नृत्ये यांमुळे ‘कलांगण’ खुलले.
नाशिक : अंगावर शहारे आणणारे पोलीस बॅण्डचे स्वर अन् त्यानंतर पाउले थिरकवायला लावणारी नृत्ये यांमुळे ‘कलांगण’ खुलले. शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्यभरात राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाचा रविवारी नाशकात प्रारंभ झाला. परशुराम साईखेडकर नाट्यगृहाच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. दर रविवारी सायंकाळी शहरातील एखाद्या मोकळ्या चौकात कार्यक्रम आयोजित करून त्याद्वारे स्थानिक लोककलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश यामागे आहे. १ मे रोजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. त्यातील पहिला कार्यक्रम आज उत्साहात झाला.प्रारंभी ग्रामीण पोलीस बॅण्डपथकाने वादन केले. ए. क्यू. सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली शकील शेख, मार्तंड शिरवंत, दादाजी सोनवणे, हरी भोये, गिरीश अमराळे, साहेबराव बलसाने, एस. एम. गुरव, एस. आर. गुरव आदिंच्या पथकाने जयोस्तुते जयोस्तुते, गर्जा महाराष्ट्र माझा, सारे जहॉँ से अच्छा या देशभक्तिपर गीतांच्या धून वाजवत उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर साईराज नृत्य कलाकेंद्र व के. के. वाघ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणेशवंदना, आय लव्ह माय इंडिया, कोळी नृत्य व गोंधळी नृत्य सादर केले. करुणा टिळे यांनी मार्गदर्शन केले. सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह मिलिंद जहागिरदार, नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी यांची प्रमुख उपस्थिती होती. जहागिरदार यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. उपक्रमाचे जिल्हा समन्वयक प्रास्ताविक केले. मीना वाघ यांनी सूत्रसंचालन केले.