कपालेश्वर मंदिरात हरिहर भेटीस प्रारंभ
By Admin | Updated: November 23, 2015 23:12 IST2015-11-23T23:07:29+5:302015-11-23T23:12:51+5:30
कपालेश्वर मंदिरात हरिहर भेटीस प्रारंभ

कपालेश्वर मंदिरात हरिहर भेटीस प्रारंभ
पंचवटी : येथील श्री कपालेश्वर महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही हरिहर भेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, आज सकाळपासून या हरिहर भेट महोत्सवाला विविध धार्मिक कार्यक्रमांनी सुरुवात करण्यात आली आहे. हरिहर भेट महोत्सवानिमित्ताने सायंकाळी श्री कपालेश्वर मंदिरात देवाला साजशृंगार करून शंकर-पार्वतीचा देखावा साकारण्यात आलेला होता.
मंगळवारी देवाला साज करून भगवान शंकर आणि विष्णू असा साजशृंगार केला जाणार आहे. बुधवारी कार्तिक पौर्णिमा असल्याने अर्धनारी नटेश्वर असा देखावा साकारला जाईल. हरिहर भेट (वैकुंठ चतुदर्शी) निमित्ताने यंदाही दरवर्षीप्रमाणे पप्पू गाडे यांच्या वतीने मंदिरात महाविष्णू यागाचे आयोजन केले आहे. मंगळवारी सायंकाळी भाविकांना महाप्रसाद वाटप केले जाणार आहे. हरिहर भेट महोत्सवाच्या अभूतपूर्व सोहळ्यात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री कपालेश्वर संस्थान, तसेच श्री कपालेश्वर भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)