शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कादवाची गाळप क्षमता वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:03 AM

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखाना सातत्याने चांगला भाव वेळेवर देत असल्याने कादवाला ऊस देण्यासाठी शेतकरी उत्सुक आहे; मात्र कादवाच्या कमी गाळप क्षमतेमुळे सर्व ऊस गाळप करणे शक्य होत नाही. त्यामुळे कादवाने आधुनिकीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगामात अधिक क्षमतेने गाळप करणे शक्य होणार असून, यंदा ४ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी सांगितले.

ठळक मुद्दे बॉयलर उभारणी : यंदा चार लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखाना सातत्याने चांगला भाव वेळेवर देत असल्याने कादवाला ऊस देण्यासाठी शेतकरी उत्सुक आहे; मात्र कादवाच्या कमी गाळप क्षमतेमुळे सर्व ऊस गाळप करणे शक्य होत नाही. त्यामुळे कादवाने आधुनिकीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगामात अधिक क्षमतेने गाळप करणे शक्य होणार असून, यंदा ४ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी सांगितले.नवीन बॉयलर उभारणी कामाचे पूजन चेअरमन श्रीराम शेटे यांच्या हस्ते तर कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ४३ व्या गळीत हंगामाचे रोलर पूजन संचालक बापूराव पडोळ यांचे हस्ते करण्यात आले, त्यावेळी शेटे बोलत होते. त्यांनी सांगितले की, डिस्टिलरी इथेलॉन प्रकल्प उभारण्याचा मानस आहे; मात्र त्यासाठी जास्त गाळप होण्याची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त ऊस लागवड व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असून जिल्ह्यातील ऊस उत्पादक कादवाला ऊस देण्यास प्राधान्य देत आहे. कमी गाळपमुळे येणाऱ्या अडचणी पाहता गाळप कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री उभी करण्यात येत आहे. नव्याने बॉयलर, टर्बाइन व मिल उभारण्यात येत असून, त्याची कामे सुरू आहे. सदर कामे पूर्ण होत येत्या हंगामात अधिक गाळप होण्याची अपेक्षाही शेटे यांनी व्यक्त केली. यावेळी व्हाइस चेअरमन उत्तम भालेराव, संपतराव कोंड, बबनराव देशमुख, रघुनाथ जाधव, युनियनचे अध्यक्ष सुनील कावळे, कार्यकारी संचालक जगन्नाथ शिंदे, सचिव बाळासाहेब उगले, मुख्य अभियंता विजय खालकर, मुख्य औषधशास्त्रज्ञ सतीश भामरे, शेतकी अधिकारी मच्छिंद्र शिरसाठ, स्थापत्य अभियंता शरदचंद्र चव्हाणके आदींसह अधिकारी, कामगार, ऊसतोड मुकादम मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलीप धारराव यांनी आभार मानले.