कादवा विकास पॅनलचे वर्चस्व

By Admin | Updated: March 26, 2015 23:52 IST2015-03-26T23:34:34+5:302015-03-26T23:52:03+5:30

कादवा कारखाना निवडणूक : क्रांती पॅनलचा धुव्वा

Kadva Development Panel domination | कादवा विकास पॅनलचे वर्चस्व

कादवा विकास पॅनलचे वर्चस्व


दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या २०१५च्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष श्रीराम शेटे यांच्या नेतृत्वाखाली कादवा विकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवत सर्वच्या सर्व १५ जागांवर विजय संपादन करत बाजीराव कावळे, सुरेश डोखळे यांच्या
क्रांती पॅनलचा धुव्वा उडवला. क्रांती पॅनलला खातेही उघडता आले नाही.
दिंडोरी येथील शासकीय वसतिगृहात गुरुवारी कादवा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश भोगे, तहसीलदार मंदार कुलकर्णी, नायब तहसीलदार मोहन कनोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सकाळी पहिला निकाल हा सोसायटी गटाचा लागला. (पान २ वर)

३६ मतदानापैकी श्रीराम शेटे यांना २०, तर संपत वक्टे यांना १५ मते मिळाली असून, एक मत बाद ठरविण्यात आले. शेटे यांचा विजय घोषित होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्सवाचे वातावरण
पाहावयास मिळाले. पोलीस निरीक्षक संजय शुक्ला
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पहिल्या विस म्हणजे निम्मे मतदानाची मोजणी होवुन शेटे यांचेसह सर्वच उमेदवारांनी सुमारे दोन हजार मतांची आघाडी मिळाली व पुढेही तसाच कल दिसुन येत असल्याने विजय दिसताच कादवा विकासच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला. सर्वच केंद्रांवर कादवा विकास पँनलने आघाडी घेतली
कादवा विकासचे विजयी पॅनल
मातेरेवाडी गट- श्रीराम शेटे (७८३६), मधुकर गटकळ (७३५७) , त्रंबक संधान (६६६५) , कसबे वणी गट - विश्वनाथ देशमुख (७७६३) , बापूराव पडोळ (७८६४)
वडनेरभैरव गट - शिवाजी बस्ते (७८९९) , उत्तम भालेराव (७७०४)
चांदवड गट- सुखदेव जाधव , सुभाष शिंदे
महिला राखीव गट- चंद्रकला घड्वजे, शांताबाई पिंगळ
इतर मागास प्रवर्ग- बाळकृष्ण जाधव
भटक्या विमुक्त जाती जमती प्रवर्ग- सुनील केदार
अनुसूचित जाती प्रवर्ग- संदीप शार्दुल
सोसायटी गट-श्रीराम शेटे-२०

क्रांती विकास पॅनल
मातेरेवाडी गट-माधव उगले-(३०३९), सुरेश डोखळे-(३५६९), दत्तात्रय शेळके-(२७७४),
वणी गट-माणिक उफाडे-(३१४७), सचिन बर्डे-(२९१४),
वडनेर भैरव-अनिल कोठुळे (२९९३), संजय पाचोरकर (१५४), शिवाजी माळी (२६८५)
सोसायटी गट-संपत वक्टे-१५

तर दिंडोरी गटामध्ये यापूर्वीच कादवा विकास पँनलचे शहाजी सोमवंशी व दिनकर जाधव हे अविरोध म्हणून निवडून आलेले आहेत.



सभासदांनी दिलेला कौल मान्य असून या पुढे कादवा कारखाना व सभासदांच्या हितासाठी तत्पर राहू- सुरेश डोखळे , नेते क्र ांती पँनल

Web Title: Kadva Development Panel domination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.