कदम यांचा अस्थिकलश आज नाशिकमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:27 IST2018-03-20T01:27:11+5:302018-03-20T01:27:11+5:30

कदम यांचा अस्थिकलश आज नाशिकमध्ये
नाशिक : कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांच्या अस्थींचे मंगळवार, दि. २० रोजी रामकुंड येथे विसर्जन होणार आहे. महाराष्टÑ प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम व त्यांचे कुटुंबीय अस्थिकलश घेऊन नाशिकमध्ये येणार असून, सकाळी ९.३० वाजता रामकुंड येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर अस्थींचे विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद अहेर, जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी केले आहे. या अस्थिविसर्जन सोहळ्यासाठी शहर कॉँग्रेसच्या वतीने गोदाकाठावर तयारी करण्यात आली असून, कॉँग्रेस कमिटीमध्येदेखील श्रद्धांजली वाहण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुंबईहून कॉँग्रेसचे अनेक मान्यवर नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.