शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कपाळमोक्ष : नागरिकांकडून मिळेना प्रतिसाद, योजना फलद्रूप होण्यात अडथळे महापालिकेच्या ‘स्मार्ट कार्ड’चा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 1:04 AM

नाशिक : कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने येस बॅँकेच्या संयुक्त विद्यमाने नियमित कर भरणाºया ५० हजार नागरिकांना मोफत प्रीपेड स्मार्ट कार्ड वितरणास सुरुवात केली असली तरी नागरिकांकडून मात्र त्याला प्रतिसाद मिळेनासा झाला आहे.

नाशिक : कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने येस बॅँकेच्या संयुक्त विद्यमाने नियमित कर भरणाºया ५० हजार नागरिकांना मोफत प्रीपेड स्मार्ट कार्ड वितरणास सुरुवात केली असली तरी नागरिकांकडून मात्र त्याला प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. पालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांना या कार्डच्या वितरणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे परंतु, नागरिकांपर्यंत कार्डची योजना नेऊन पोहोचविणे आणि त्यांच्याकडून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून घेणे कर्मचाºयांना कष्टप्रद ठरत आहे. त्यामुळे प्रीपेड स्मार्ट कार्डची योजना लवकरच गुंडाळण्याची नामुष्की महापालिकेसह संबंधित बॅँकेवर ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महापालिकेने प्रीपेड स्मार्ट कार्ड तयार करत त्याचे वाटप विभागीय कार्यालयांमधून सुरू केले आहे. काही विभागीय कार्यालयांमध्ये कार्ड्स येऊन पडली आहेत परंतु, त्यांचे वाटप कसे करायचे हा यक्ष प्रश्न विभागीय अधिकाºयांना सतावतो आहे. नियमित कर भरणा करणाºया नागरिकांमधून ५० हजार लोकांची निवड करून त्यांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर विभागनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मात्र, आपल्याला स्मार्ट कार्ड मोफत मिळणार आहे, याची खबर अद्याप संबंधित निवड झालेल्या नागरिकांपर्यंत जाऊन पोहोचलेली नाही. सदर स्मार्ट कार्ड संबंधीची माहिती देणारे एसएमएस निवड झालेल्या नागरिकांच्या मोबाइलवर पाठविले जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगितले जात असले तरी, निवड झालेल्या नागरिकांचे मोबाइल क्रमांकच कर विभागाकडे उपलब्ध नसल्याने एसएमएस कसे जाणार, हा प्रश्न उपस्थित होतो.कार्डचा आम्हाला काय उपयोग?सदर स्मार्ट कार्ड कोणत्याही कार्डप्रमाणे सर्व ठिकाणी म्हणजेच मॉल्स, शॉपिंग सेंटर्स व अन्य इतर ठिकाणी वापरता येणार आहे. सदर कार्डाद्वारे सर्व प्रकारची देयके, सेवाशुल्क भरता येईल. कार्डवर कॅश रिलोड व कॅश ट्रान्सफरसारख्या सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. परंतु, निवड करण्यात आलेले बव्हंशी करपात्र नागरिक हे सामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने त्यांच्याकडून ‘आम्हाला या कार्डचा काय उपयोग’ अशी उत्तरे मनपाच्या कर्मचाºयांना ऐकायला मिळत आहेत.सवलत योजनेचा विचार?संकेतस्थळावर विभागनिहाय नागरिकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे परंतु, विभागानुसार दहा हजार नागरिकांमधून आपले नाव शोधताना दमछाक होत आहे. मोबाइल नंबर नसल्याने नागरिकांना त्यांची निवड झाल्याचे कसे कळवावे, हा प्रश्न विभागीय अधिकाºयांपुढे आहे. घरपट्टी वसुली विभागातील कर्मचाºयांच्या माहितीतल्या नागरिकांना बोलावून घेत स्मार्ट कार्ड वितरणाची प्रक्रिया पार पाडली जात असली तरी, केवायसीसाठी कागदपत्रे देण्यास नागरिकांकडून नकार दिला जात आहे. नागरिकांना स्मार्ट कार्डबरोबरच काही इन्सेन्टीव्ह म्हणून सवलत योजना लागू करता येईल काय, असा एक विचार पुढे आला आहे. परंतु सदरचा निर्णय हा धोरणात्मक असल्याने आणि त्यासाठी खर्चाची तरतूद कोणी करायची हा एक वादाचा मुद्दा असल्याने प्रशासनाकडूनही चाचपणी सुरू आहे.एका बॅँकेच्या फायद्यासाठी महापालिका आपल्या खजिन्यातून निधी उपलब्ध करून देईल, असे वाटत नाही.