कड, सय्यद यांना राष्ट्रपतिपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:18 IST2017-08-14T23:51:53+5:302017-08-15T00:18:38+5:30
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर शिवाजी कड यांना उल्लेखनीय कार्याबद्दल, तर विशेष शाखेतील सहायक पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर अन्वर सय्यद यांना वैशिष्ट्यपूर्ण सेवेबाबत सोमवारी (दि़१४) राष्ट्रपतिपदक जाहीर झाले आहे़ नाशिक परिक्षेत्रात वरिष्ठ पोलीस अधिकाºयांमध्ये कड यांना तर शहर पोलीस आयुक्तालयात २७ वर्षांमध्ये पहिल्यांदाच सय्यद यांच्या रूपाने कर्मचाºयास राष्ट्रपतिपदक मिळाले आहे़

कड, सय्यद यांना राष्ट्रपतिपदक
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर शिवाजी कड यांना उल्लेखनीय कार्याबद्दल, तर विशेष शाखेतील सहायक पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर अन्वर सय्यद यांना वैशिष्ट्यपूर्ण सेवेबाबत सोमवारी (दि़१४) राष्ट्रपतिपदक जाहीर झाले आहे़ नाशिक परिक्षेत्रात वरिष्ठ पोलीस अधिकाºयांमध्ये कड यांना तर शहर पोलीस आयुक्तालयात २७ वर्षांमध्ये पहिल्यांदाच सय्यद यांच्या रूपाने कर्मचाºयास राष्ट्रपतिपदक मिळाले आहे़ १९९२ साली मधुकर कड यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेत प्रवेश केला़ त्यानंतर नागपूरला दहा वर्षे, परळी व औरंगाबाद (सात वर्षे), नाशिक ग्रामीणमधील घोटी पोलीस ठाणे (१ वर्षे), दहशतवाद विरोधी पथक (साडेचार वर्षे), भद्रकाली पोलीस ठाणे दोन वर्षे व सद्यस्थितीत अंबड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी कार्यरत आहेत़ मुंबईतील जव्हेरीबाजार व मुंबादेवी बॉम्बस्फोट खटला तसेच पुणे येथील जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची कामगिरी कड यांनी बजावली आहे़ पोलीस दलातील उल्लेखनीय कामाबाबत त्यांना २७५ रिवॉर्ड मिळाले असून, २००८ मध्ये पोलीस महासंचालक सन्मानचिन्हही मिळाले आहे़
१९७९ मध्ये पोलीस शिपाई या पदावर भरती झालेले व सद्यस्थितीत शहर पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेत सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले मुजफ्फर अन्वर सय्यद यांना नाशिकमधील १९९१, २००३ व २०१५ या तीन सिंहस्थ कुंभमेळ्याचा नियोजनाचा अनुभव आहे़ याबरोबरच त्यांना कुंभमेळा नियोजनासाठी अलाहाबाद, उज्जैन याठिकाणीही पाठविण्यात आले होते़ सय्यद यांना २०१२ मध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली असून, त्यांनी गुन्हे शाखेत असताना उल्लेखनीय कामगिरी केली आहे़ राष्ट्रपतिपदक मिळाल्याबाबत पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल तसेच वरिष्ठ अधिकाºयांनी या दोघांचेही अभिनंदन केले आहे़