निफाड महोत्सवांतर्गत कबड्डी स्पर्धा
By Admin | Updated: January 7, 2017 00:37 IST2017-01-07T00:37:02+5:302017-01-07T00:37:14+5:30
नगरपंचायतच्या उपक्रमामुळे कलावंत, खेळाडू चमकले

निफाड महोत्सवांतर्गत कबड्डी स्पर्धा
निफाड : येथील नगरपंचायतच्या वतीने आयोजित निफाड महोत्सवांतर्गत निफाड इंग्लिश स्कूल येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उद्घाटनप्रसंगी नगरसेवक मुकुंद होळकर, संदीप जेऊघाले, नगरपंचायतचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, शिवसेना शहरप्रमुख संजय कुंदे, शांताराम कर्डिले, भगवान गाजरे, निफाड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अ. ना. वाघ आदि उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडाशिक्षक सुभाष खाटेकर, दिलीप कुंभार्डे, रमेश वडघुले, विलास गायकवाड, दत्ता रायते आदिंसह नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)