कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:30 IST2017-07-27T00:30:03+5:302017-07-27T00:30:19+5:30

नाशिक : कारगिल विजय दिनानिमित्त शहरातील विविध संस्था, संघटना व शाळांमध्ये कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली.

kaaragaila-vaijaya-dainaanaimaitata-sahaida-javaanaannaa-adaraanjalai | कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना आदरांजली

कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कारगिल विजय दिनानिमित्त शहरातील विविध संस्था, संघटना व शाळांमध्ये कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली.  कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्मा स्मारकात भाजपा माजी सैनिक आघाडी, नाशिक ग्रामीण शहर व महिला आघाडी यांच्या वतीने शहिदांना वंदन करण्यात आले. यावेळी माजी सैनिक शहराध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेरकर, महिला शहराध्यक्ष साधना दुसाने, विद्या बागुल, शाबीर शेख, रूपाली चौधरी, शिल्पा पारनेरकर, श्रीराम आढाव आदी उपस्थित होते.
शिशुविहार शाळा हिंदू मध्यवर्ती सैनिकी सोसायटीच्या शिशुविहार इंग्रजी माध्यम शाळेत कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. माधुरी गडाख यांनी कारगिल युद्धाविषयी माहिती दिली. तसेच कारगिल युद्धावर लघुपट दाखविण्यात आला. यावेळी जवानांना आदरांजली वाहण्यात आली.


.

Web Title: kaaragaila-vaijaya-dainaanaimaitata-sahaida-javaanaannaa-adaraanjalai