के. के. वाघ महाविद्यालयात कॉमर्स फेस्टिव्हल उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:13 IST2021-04-05T04:13:19+5:302021-04-05T04:13:19+5:30

नाशिक : के. के. वाघ आर्टस् कॉमर्स सायन्स अँड कॉम्पुटर सायन्स महाविद्यालयात कॉमर्स फेस्टिव्हल इम्पेटस २०२१ ऑनलाईन पद्धतीने ...

K. K. Commerce Festival at Wagh College in full swing | के. के. वाघ महाविद्यालयात कॉमर्स फेस्टिव्हल उत्साहात

के. के. वाघ महाविद्यालयात कॉमर्स फेस्टिव्हल उत्साहात

नाशिक : के. के. वाघ आर्टस् कॉमर्स सायन्स अँड कॉम्पुटर सायन्स महाविद्यालयात कॉमर्स फेस्टिव्हल इम्पेटस २०२१ ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. या तीनदिवसीय कॉमर्स फेस्टिव्हलचे उद्घाटन स्वप्निल खराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना गुंतवणूक व शेअर ट्रेडिंग या विषयावर मार्गदर्शन केले.

महाविद्यालयातील या तीनदिवसीय कॉमर्स फेस्टिव्हलमध्ये बिसिनेस क्विझ, शॉर्ट फिल्म, पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन, पोएट्री कॉम्पेटिशन, ऍड मॅड शो, बेस्ट आऊट ऑफ वेस्ट अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यशस्वी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, प्रा. पवन जोशी यांनी वर्क मोटिवेशन विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर डॉ. व्ही. एम. सेवलीकर व प्राचार्य डॉ. ए. पी. राजपूत यांनी कोविड १९ च्या काळात सकारात्मक राहण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी वाणिज्य विभागप्रमुख डॉ. ए. डी. नांदुरकर, बी.बी.ए. विभागप्रमुख प्रा. सुप्रिया डावरे आणि कॉमर्स फेस्टिव्हल समन्वयक प्रा. दीप्ती शिलेदार उपस्थित होते. प्रा. लीना तलरेजा यांनी आभार मानले.

Web Title: K. K. Commerce Festival at Wagh College in full swing