के. जे. मेहता हायस्कूल व इ.वाय. फडोळ जुनियर कॉलेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:10 IST2021-06-22T04:10:58+5:302021-06-22T04:10:58+5:30

जागतिक योग दिनानिमित्त प्रारंभी प्राचार्य भागीनाथ घोटेकर यांनी सर्व उपस्थित शिक्षकांना योगसंकल्प दिला. यावेळी सिन्नरच्या एस. जी. पब्लिक स्कूल ...

K. J. Mehta High School and E.Y. Fadol Junior College | के. जे. मेहता हायस्कूल व इ.वाय. फडोळ जुनियर कॉलेज

के. जे. मेहता हायस्कूल व इ.वाय. फडोळ जुनियर कॉलेज

जागतिक योग दिनानिमित्त प्रारंभी प्राचार्य भागीनाथ घोटेकर यांनी सर्व उपस्थित शिक्षकांना योगसंकल्प दिला. यावेळी सिन्नरच्या एस. जी. पब्लिक स्कूल शाळेचे योग प्रशिक्षक बापूसाहेब चतुर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनियर कॉलेज विभागातील प्राध्यापकांनी योग प्रार्थनेने योगासनांचा प्रारंभ करण्यात आला. योगासनांची खडे प्रकार त्यामध्ये प्रामुख्याने ताडासन, वृक्षासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन तसेच बैठ्या प्रकारांमध्ये भद्रासन, वज्रासन, शशांकासन ,वक्रासन, कपालभाती, प्राणायाम इत्यादी योग प्रात्यक्षिकांचा सराव योग शिक्षकांनी करून घेतला.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य उदय देवनपल्ली, संजय शिंदे, प्राध्यापिका साधना धोंडगे, विद्या जोशी, पर्यवेक्षिका श्रीलेखा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक धनंजय पाठक यांनी केले. क्रीडा शिक्षक गजानन सातपुते यांनी आभार मानले. शांतिपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे रवींद्र शिरसाठ, साहेबराव निळे, प्रशांत शिरसागर, चंद्रकांत भालेराव, मिलिंद टिळे, गणेश साबळे यांनी केले होते. जुनियर कॉलेज विभागातील सुमारे ३५ प्राध्यापक, प्राध्यापिका सहभागी झाले होते.

===Photopath===

210621\21nsk_42_21062021_13.jpg

===Caption===

के. जे. मेहता हायस्कूल व इ.वाय. फडोळ जुनियर कॉलेजमध्ये योगा

Web Title: K. J. Mehta High School and E.Y. Fadol Junior College