के. बी. एच. विद्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:13 IST2021-04-15T04:13:28+5:302021-04-15T04:13:28+5:30
मालेगाव : कॅम्पातील केबीएच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन वक्तृत्व व निबंध ...

के. बी. एच. विद्यालय
मालेगाव : कॅम्पातील केबीएच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल पवार होते. यावेळी प्राचार्य पवार, उपप्राचार्य रवींद्र शिरूडे, उपप्राचार्य राजेंद्र पाटील, पर्यवेक्षक प्रवीण पाटील, एस. डी. महाले , बी. डी. सोनवणे, कार्यालयीन प्रमुख जे. एस. कन्नोर, संजय सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाला एम. आर. अहिरे, प्रा. पी. एन. शिंदे, प्रा. राजेश सूर्यवंशी, ए. के. खेडकर, एस. आर. नेरकर, आनंद भालेराव, प्रमोद पिंपळसे, शांतीलाल चव्हाण उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य पवार यांनी मार्गदर्शन केले. शिक्षक आनंद भालेराव यांनीही मनोगत व्यक्त केले. यानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत वेदांत प्रवीण नेरकर याने प्रथम, प्रणव अनिल खरे याने द्वितीय तर सर्वेश अनिल पवार याने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत सुबोध महेश चव्हाण याने प्रथम, हर्षल शर्मा याने द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना व्यंकट मगर व आर. बी. बच्छाव यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र शेवाळे यांनी केले तर राजेश धनवट यांनी आभार मानले.