सुटीचे औचित्य : चांदवडला गर्दी वाढली, सुरक्षिततेसाठी एकाच रांगेतून भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश
By Admin | Updated: September 28, 2014 22:35 IST2014-09-28T22:34:17+5:302014-09-28T22:35:25+5:30
रेणुकामातेच्या चरणी भाविक नतमस्तक

सुटीचे औचित्य : चांदवडला गर्दी वाढली, सुरक्षिततेसाठी एकाच रांगेतून भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश
चांदवड : चांदवड निवासिनी श्री रेणुका देवीच्या नवरात्र उत्सवात आज चौथ्या माळेला रविवार सुटीचे औचित्य साधून लाखो भाविक श्री रेणुका देवीच्या चरणी नतमस्तक झाले.
यंदाच्या वर्षी २४ तास भाविकांची गर्दी होत असून, सुरक्षितेच्या कारणासाठी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एकाच रांगेत मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्यात येत आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी दोन स्वतंत्र जिन्याची व्यवस्था केली आहे. उन्हाचा तडाखा असताना सुद्धा गर्दी वाढत आहे.
यात्रोत्सव काळात सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट सहायक पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, गृहरक्षकदल पुरुष, महिला कर्मचारी कार्यरत आहे, तर ग्रामपंचायत सरपंच विजय कोतवाल व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी डी. आर. ठाकरे यांनी रस्त्यावर ठिकठिकाणी विद्युत दिव्याची व पाण्याच्या टँकरची सोय केली आहे. या उत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असून, विविध मान्यवरांच्या हस्ते महाभिषेक व शतचंडी, नवचंडी यज्ञ, होमहवन होत असून, महाआरतीसाठी चंद्रेश्वर भक्तमंडळाचे कार्यकर्ते मदत करीत आहे. यावर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सव यशस्वीतेसाठी व्यवस्थापक एम. के. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक व्यवस्थापक सुभाष पवार, तान्हाजी अहिरराव, पुरोहित प्रकाश वैद्य, हरेंद्र वैद्य, अमोल कुलकर्णी, विजय जोशी, नारायण कुमावत, खंडू अहेर, हरिभाऊ कासव, काळू पवार व सामाजिक कार्यकर्ते किसन बल्लाळ, जगन्नाथ राऊत, दिनकर कोतवाल, शेरू ब्रदर्स, दीपक कुमावत व चंद्रेश्वर भक्तमंडळाचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.