गतिमंद पीडितेला न्याय द्यावा,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:18 IST2021-08-14T04:18:11+5:302021-08-14T04:18:11+5:30

मानोरी : महालखेडा ( ता. येवला ) येथील एका मतिमंद मुलीवर अतिप्रसंग करून छेडछाडीच्या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या ...

Justice should be given to the aggrieved victim, | गतिमंद पीडितेला न्याय द्यावा,

गतिमंद पीडितेला न्याय द्यावा,

मानोरी : महालखेडा ( ता. येवला ) येथील एका मतिमंद मुलीवर अतिप्रसंग करून छेडछाडीच्या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य एकलव्य आदिवासी परिषद संघटनेकडून येवला पोलीस ठाण्यात देण्यात आले.

या संदर्भात कठोर कारवाई न झाल्यास बुधवार (दि.१८) पासून पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सदर घटनेत येवला तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवरी यांनी तातडीने पावले उचलली असून, संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे; मात्र या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, आरोपीवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे. (१२ मानोरी)

120821\330812nsk_44_12082021_13.jpg

निवेदन.

Web Title: Justice should be given to the aggrieved victim,