अतिसंवेदनशील केंद्रात उमेदवार जुंपले; पोलीसांनी दाखविला दंडुका
By Admin | Updated: February 21, 2017 14:35 IST2017-02-21T14:35:51+5:302017-02-21T14:35:51+5:30
महापालिक ा निवडणूकीचे मतदान सुरू असताना सातपूर भागातील अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या परिसरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये

अतिसंवेदनशील केंद्रात उमेदवार जुंपले; पोलीसांनी दाखविला दंडुका
नाशिक : महापालिक ा निवडणूकीचे मतदान सुरू असताना सातपूर भागातील अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या परिसरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये रिपाइं, भाजपां पक्षाचे उमेदवार आपआपसांत भिडले.
महापालिकेच्या शाळेत सुरू असलेल्या कें द्रात हा प्रकार घडला. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागल्याने अखेर बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी दोघांना दंडुका दाखवून समज दिली. त्यानंतर या केंद्रावर व्हिडिओ कॅमेरा तैनात करण्यात आला. भाजपाचे उमेदवार दिनकर पाटील व रिपाइंचे प्रकाश लोंढे हे दोन्ही उमेदवार सध्याचे विद्यमान नगरसेवक आहेत. या दोघांनी एकमेकांवर मतदारांना चिन्ह सांगत असल्याचा आरोप-प्रत्यारोप केला होता. यावरून दोघांमध्ये वादविवाद घडला. या दोघांना पोलीसांनी कडक वॉर्निंग देत कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास थेट कारवाई करण्याचा अंतीम इशारा दिला आहे.