बनावट नोटा प्रकरणातील छबू नागरेला जामीन

By Admin | Updated: April 4, 2017 01:32 IST2017-04-04T01:32:01+5:302017-04-04T01:32:14+5:30

नाशिक : बनावट नोटा छापून त्या कमिशनपोटी बदलून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रमुख संशयित छबू दगडू नागरे यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांनी सोमवारी (दि़३)जामीन मंजूर केला़.

Junket's bail plea in fake currency | बनावट नोटा प्रकरणातील छबू नागरेला जामीन

बनावट नोटा प्रकरणातील छबू नागरेला जामीन

नाशिक : चलनातील पाचशे व एक हजार रुपये दंडाच्या बनावट नोटा छापून त्या कमिशनपोटी बदलून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या अकरा संशयितांमधील प्रमुख संशयित तथा राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी छबू दगडू नागरे यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांनी सोमवारी (दि़३) अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला़ दरम्यान, या गुन्ह्यातील दहा संशयितांना यापूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला आहे़
राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी छबू नागरे याने कमिशनवर जुन्या नोटा बदलून देण्यासाठी राहत्या घरी एक कोटी ३५ लाख रुपयांच्या पाचशे व एक हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा छापल्या़ या नोटा कमिशनवर बदलण्यासाठी तो आपल्या अकरा साथीदारांसमवेत स्कोडा (एमएच १५, सीएम ७००२), फोर्ड फिगो (एमएच ०४, इएफ ९७०१) व सियाझ (एमएच १५, एफएच २१११) या तीन वाहनांतून २२ डिसेंबर २०१६ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जात असताना शहर पोलिसांनी हॉटेल जत्रासमोर अडवून या सर्वांना अटक केली होती़ या संशयितांकडून १़३५ कोटींच्या बनावट नोटा व वाहनेही जप्त करण्यात आली होती़
आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर नागरे हा २३ ते २९ डिसेंबरदरम्यान पोलीस कोठडीत व त्यानंतर नाशिकरोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता़ या प्रकरणातील बारा संशयितांपैकी दहा संशयितांचा यापूर्वीच जामीन झाला असून, सोमवारी नागरेचा जामीन झाल्याने अकराही संशयित आता जामिनावर आहेत़
दरम्यान, नागरेला जामीन देताना न्यायालयाने अटी व शर्तींचे पालन करण्याची अट घातली असून, उल्लंघन झाल्यास जामीन रद्द केला जाणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Junket's bail plea in fake currency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.