शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

करवाढ रद्द निर्णयावरून भाजपातच द्वंद्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 01:05 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढीसंदर्भात निर्गमित केलेला आदेश रद्द करण्यावरून भाजपाअंतर्गतच जुंपली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे परस्पर विरोधी माहिती देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सभागृह नेत्यांनी हात झटकले असून, हा पालकमंत्र्यांना अंधारात ठेवल्याप्रकरणी शहराध्यक्षांवर जबाबदारी लोटली आहे. दुसरीकडे करवाढ रद्द करण्याचा निर्णय आपण दिनकर पाटील यांना कधीही दिला नव्हता.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढीसंदर्भात निर्गमित केलेला आदेश रद्द करण्यावरून भाजपाअंतर्गतच जुंपली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे परस्पर विरोधी माहिती देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सभागृह नेत्यांनी हात झटकले असून, हा पालकमंत्र्यांना अंधारात ठेवल्याप्रकरणी शहराध्यक्षांवर जबाबदारी लोटली आहे. दुसरीकडे करवाढ रद्द करण्याचा निर्णय आपण दिनकर पाटील यांना कधीही दिला नव्हता. आपण महापौर आणि गटनेत्यांशी चर्चा केली होती, असा दावा शहराध्यक्ष सानप यांनी मंगळवारी (दि.२४) केला आहे.  स्थानिक भाजपातील गटबाजीमुळे त्रस्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढे यांच्यासारखा आयुक्त पाठविला. मुंढे यांच्या कार्यपद्धतीवरून भाजपाअंतर्गत विरोधी गट एकत्र आल्याचे दिल्याचे चित्र निर्माण झाले असताना करवाढीचा निर्णय पालकमंत्र्यांना अंधारात ठेवून घेण्यात आल्याचे उघड होताच पुन्हा कुरघोडीचे राजकारण सुरू झाल्याचे वृत्त आहे.  गेल्या १९ जुलैस करवाढ रद्द करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. यावेळी सात ते आठ तास चाललेल्या महासभेत आयुक्तांच्या आदेशाच्या विरोधात १०५ नगरसेवकांनी भूमिका घेतली असली तरी तत्पूर्वी म्हणजे १४ जुलै रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मनपातील भाजपा पदाधिकारी आणि आयुक्तांची बैठक घेतली व त्यात भाजपा पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आठ दिवसांत निर्णय घेऊ, असे जाहीर केले होते. परंतु तत्पूर्वीच महासभा झाल्याने अखेरीस भाजपाने करवाढविरोधी निर्णय  घेतला होता. मात्र पालकमंत्र्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता हा निर्णय झाल्यानंतर त्यांनी शहराध्यक्षांना याबाबत विचारणा केली असता  त्यांनी सभागृहनेता दिनकर पाटील व गटनेता संभाजी मोरुस्कर यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितल्याचे वृत्त आहे.  त्यामुळे पाटील यांनी नाराजी व्यक्त करून पालकमंत्री गिरीश महाजन, संघटनमंत्री किशोर काळकर यांना निवेदन पाठविले असून, त्यात म्हटल्यानुसार करवाढ रद्द करण्याचा निर्णय भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आणि महापौर रंजना भानसी यांचा आहे. आपण केवळ त्याचे पालन केले. महापालिकेतील सर्व निर्णय तेच घेत असतात, असेही त्यांनी म्हटले आहे. करवाढ रद्दच्या विषयावर सभागृह नेतेच भूमिका बदलत असल्याने गोंधळाचे वातावरण आहे.  शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी मात्र हा निर्णय आपण घेतला. यात दुमत नाही. सभागृहात १०५ सदस्यांनी करवाढीच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे मी सभागृहाबरोबर रहात असल्याचे सांगितले, असे सानप म्हणाले.पालकमंत्र्यांशी बोलणारकरवाढीच्या विषयावर मी पहिल्यापासून शेतकºयांबरोबर आहे. पालकमंत्र्यांनी आठ दिवसांत निर्णय देऊ, असे सांगितले असतानाही मध्येच महासभा घेण्यात आली. त्यामुळे करवाढीबाबत निर्णय घेणे भाग होते. महासभेत काय निर्णय घ्यायचा? असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा १०५ नगरसेवक विरोधात बोलल्याने निर्णय घेणे भाग होते. त्यानुसार मी, महापौर रंजना भानसी आणि गटनेता संभाजी मोरुस्कर यांच्याशी चर्चा केली. पाटील यांच्याशी चर्चा केली नव्हती. पालकमंत्र्यांशी करवाढ रद्दच्या निर्णयाबाबत अद्याप बोलणे झालेले नाही. त्यांच्याशी मी चर्चा करेल.- बाळासाहेब सानप, आमदार

टॅग्स :BJPभाजपाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका