जून महिना कोरडा, जलसंकट गडद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2016 00:13 IST2016-06-30T23:56:59+5:302016-07-01T00:13:31+5:30
धरणसाठ्यात घट : मनपा ढिम्म

जून महिना कोरडा, जलसंकट गडद
नाशिक : संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर आता अवघे ३३ दिवस पुरेल इतका आरक्षित पाणीसाठा गंगापूर धरणात शिल्लक असल्याने शहरावरील जलसंकट आणखी गडद होत जाणार आहे. मात्र, पाणीकपातीच्या फेरनियोजनाबाबत महानगरपालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अद्याप कसलीही हालचाल नसल्याने या ढिम्मपणाबद्दल आश्चर्य आणि चिंताही व्यक्त केली जात आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ९४६ दलघफू (१७ टक्के) पाणीसाठा शिल्लक असून, त्यात महापालिकेचा ३३० दलघफू पाणीसाठा आरक्षित आहे.