शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शहर बससेवेसाठी कंपनीत जम्बो सदस्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:51 IST

: शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी महापालिकेच्या वतीने निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन समिती ऐवजी कंपनी स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नाराज झालेल्या सत्तारूढ भाजपाने सर्वांना सामावून घेण्यासाठी नवी युक्ती शोधून काढली असून, सुमारे परिवहन समिती इतकेच सदस्य बस कंपनीचे संचालक म्हणून घुसवण्यात येत आहेत. या घोळामुळे सुमारे तीन महिने होत आले तरी बस वाहतूक सुरू करण्याचा ठरावच प्रशासनाला प्राप्त झालेला नाही.

नाशिक : शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी महापालिकेच्या वतीने निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन समिती ऐवजी कंपनी स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नाराज झालेल्या सत्तारूढ भाजपाने सर्वांना सामावून घेण्यासाठी नवी युक्ती शोधून काढली असून, सुमारे परिवहन समिती इतकेच सदस्य बस कंपनीचे संचालक म्हणून घुसवण्यात येत आहेत. या घोळामुळे सुमारे तीन महिने होत आले तरी बस वाहतूक सुरू करण्याचा ठरावच प्रशासनाला प्राप्त झालेला नाही.  महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक चालवावी किंवा नाही याबाबत दुमत असतानाच राज्य सरकारने बळजबरी केल्याने अखेरीस बससेवा महापालिकेने चालवण्याचे धोरण निश्चित केले. सदरचा प्रस्ताव महासभेवर तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडला. तेव्हा तो मंजूर करण्याआधी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई वारी केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनीही कायद्यात बसत असेल परिवहन समिती गठित करण्याचा ठराव करण्यास संमती दिली, असे भाजपाचे पदाधिकारी सांगत होते. त्यानुसार महासभेत दोन महिन्यांपूर्वी शहर बस चालविण्याचा निर्णय घेतानाच परिवहन समितीमार्फत ही सेवा संचलीत करावी असे ठरविण्यात आले. तसा ठरावदेखील करण्यात आला. अर्थात, तुकाराम मुंढे हे परिवहन समितीऐवजी कंपनी करण्यावर भर देत होते. आॅक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या विविध योजनांचा आढावा घेताना बससेवेबाबत मुंढे यांची भूमिका मान्य करीत परिवहन समितीऐवजी कंपनीच्या माध्यमातून बससेवा सक्षमपणे चालवण्याचे आदेश दिले.  त्यामुळे परिवहन समितीचा ठराव करूनही सत्ताधारी पेचात सापडले.  या परिस्थितीवर मात करण्यासाठी सत्ताधाºयांनी नवी शक्कल शोधली असून कंपनीत पदसिद्ध पदाधिकाºयांबरोबरच अनेक जणांची नावे घुसविण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे कंपनी आता परिवहन समिती इतक्याच सदस्यांची शक्यता असल्याचे भाजपाचे पदाधिकारी सांगत आहेत. अर्थात, मुख्यमंत्री फडणवीस याबाबत काय निर्णय घेतात हे महत्त्वाचे आहे.आयुक्त कायदेशीर कार्यवाही करणारमहापालिकेच्या महासभेत झालेला ठराव ९० दिवसांत प्रशासनाला प्राप्त झाला नाही तर त्या निर्णयाचे सर्वाधिकार आयुक्तांना प्राप्त होतात. शहर बस वाहतुकीसंदर्भात तीन महिन्यांपूर्वी महासभेत चर्चा झाली आणि ठरावही झाला. बुधवारी (दि.१९) या निर्णयाला ९० दिवस पूर्ण होत असून, आता आयुक्त राधाकृष्ण गमे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आयुक्त गमे यांनी सांगितले.परिवहन समितीचा हट्टज्या महापालिकांमार्फत बससेवा चालविली जाते तेथे स्थायी समिती इतकीच महत्त्वाची आणि दुसºया अर्थाने मलईदार समिती म्हणून परिवहन समितीकडे बघितले जाते. त्यातच ज्याठिकाणी परिवहन समितीमार्फत बससेवा चालवली जाते त्या सर्वच ठिकाणी तोटा आहे. त्यामुळे कमीत कमी तोटा व्हावा यासाठी महापालिकेने कंपनी स्थापन करूनच ही सेवा द्यावी, असा मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक