अ जर्नी ब्ल्यू टू ग्रीन’चे प्रकाशन
By Admin | Updated: May 20, 2016 00:06 IST2016-05-19T23:27:54+5:302016-05-20T00:06:29+5:30
अ जर्नी ब्ल्यू टू ग्रीन’चे प्रकाशन

अ जर्नी ब्ल्यू टू ग्रीन’चे प्रकाशन
नाशिक : ‘ग्रीन कुंभ’ संकल्पनेतून सिंहस्थ यशस्वी झाला खरा; परंतु सिंहस्थ संपल्यानंतर गोदेकडे सर्वच स्तरातून दुर्लक्ष करण्यात आले आणि गोदावरीला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. या सगळ्या प्रकाराला आपण सगळेच जबाबदार असून, गोदावरी स्वच्छतेच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत, असे मत हेमंत बेळे यांनी ‘नाशिक कुंभ : अ जर्नी आॅफ ब्ल्यू टू ग्रीन’ या लघुपटाच्या प्रकाशनप्रसंगी व्यक्तकेले.
किर्लाेस्कर वसुंधरा यांच्यातर्फे कुसुमाग्रज स्मारकात लघुपट प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या लघुपटाचे दिग्दर्शन हेमंत बेळे यांनी केले असून, लघुपटाचे संशोधन आणि माहिती संकलन अमित टिल्लू यांनी केले आहे. या लघुपटासाठी स्वप्नील राव, महेश कावळे यांचे सहकार्य लाभले. या लघुपटात कुंभ अधिकारी उपआयुक्त महेश पाटील, आखाडा परिषदेचे समन्वयक धनंजय बेळे, पर्यावरण चळवळीतील राजेश पंडित, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. धनश्री हरदास यांच्या प्रतिक्रियांचादेखील समावेश करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील महोत्सवांमध्ये हा लघुपट दाखविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या प्रकाशन सोहळ्यास समीर पटवा, मकरंद देवधर, संजय पाटील, वीरेंद्र चित्राव, मंदार पाराशरे, हेमंत बेळे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘