आयएमएच्या वतीने कोरोनाकाळातील कार्याबद्दल पत्रकारांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:42 IST2021-01-08T04:42:54+5:302021-01-08T04:42:54+5:30

नाशिक : कोरोनाच्या महासंकटात पत्रकारितेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या वतीने पत्रकारांचा गौरव करण्यात आला. आयएमएच्या ...

Journalists praised for work in the Corona period on behalf of IMA | आयएमएच्या वतीने कोरोनाकाळातील कार्याबद्दल पत्रकारांचा गौरव

आयएमएच्या वतीने कोरोनाकाळातील कार्याबद्दल पत्रकारांचा गौरव

नाशिक : कोरोनाच्या महासंकटात पत्रकारितेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या वतीने पत्रकारांचा गौरव करण्यात आला. आयएमएच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ‘लोकमत’चे उपसंपादक धनंजय रिसोडकर यांच्यासह अन्य पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. शालिमार येथे बुधवारी (दि.६) सायंकाळी झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर आयएमएचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे, उपाध्यक्ष डॉ. प्राजक्ता लेले, सचिव डॉ. सुदर्शन आहिरे, डॉ. प्रशांत साेनवणे, डॉ. निकिता पाटील, डॉ. स्वाती वंजारी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. चंद्रात्रे यांनी कोरोनाकाळात पत्रकारांनी केलेल्या कार्याबद्दल गौरवोद‌्गार काढले. कोरोना प्रतिबंधासाठी अद्याप लस प्रत्यक्ष उपलब्ध झालेली नाही. ती कधीपर्यंत उपलब्ध हेाईल हेही सांगता येत नाही. मात्र, तोपर्यंत प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. स्ट्रेन व्हायरसचा धोका वाढत असला तरी त्यात मृत्युदर अधिक नसल्याने फारसे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही असेही त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राहूल रनाळकर, प्रताप पवार यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी अन्य माध्यम प्रतिनिधींना गौरवण्यात आले.

Web Title: Journalists praised for work in the Corona period on behalf of IMA