मराठा क्र ांती मूक मोर्चात सहभागी व्हा

By Admin | Updated: September 11, 2016 00:36 IST2016-09-11T00:36:43+5:302016-09-11T00:36:54+5:30

करण गायकर : कळवण येथील बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती

Join the Maratha Kranti silent rallies | मराठा क्र ांती मूक मोर्चात सहभागी व्हा

मराठा क्र ांती मूक मोर्चात सहभागी व्हा

 कळवण : कोपर्डी येथील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच मराठा समाजाला आरक्षण व अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात येणार असून, मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने मराठा कुंभमेळा नाशकात भरणार आहे; मात्र शिस्तीचे दर्शन या मराठा क्र ांती मूक मोर्चात दिसेल, असा विश्वास छावा क्र ांतिवीर सेनेचे प्रमुख करण गायकर यांनी कळवण येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
नाशिक येथील मोर्चाचे नियोजन करण्यासाठी कळवण येथील छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या नियोजन बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना गायकर यांनी नियोजनबद्ध माहीत देऊन घराघरातून मराठा समाज बांधव सहभागी होणार आहे. सर्वपक्षीय मराठा नेते एकत्र आले असून, नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्यावी, तसेच मराठा समाजातील नागरिकांवर खोटे आरोप करून त्यांच्यावर जबरीने अ‍ॅट्रॉसिटी अन्वये गुन्हे दाखल केले जातात व नंतर त्यांना ब्लॅकमेल केले जाते. इतर समाजाप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे असून, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. कोपर्डीसारखी घटना पुन्हा घडू नये, मराठा समाजावर अन्याय होऊ नये यासाठी मराठा समाजाने एकत्रित येणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
जिल्ह्यातील हा मोर्चा इतिहास घडवणार असून, त्यासाठी सर्व जण सामील होतीलच; पण जास्त संख्येने कळवण तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन गायकर यांनी केले. मोर्चात दगडफेक झाली, लाठीचार्ज झाला अशा अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माइकवरून येणाऱ्या सूचनांकडेच लक्ष देण्याचेही आवाहन छावा क्रांतिवीर सेनेचे करण गायकर यांनी यावेळी केले.
यावेळी शिवसेनेचे जितेंद्र वाघ, मनसेचे शशिकांत पाटील, युवक काँग्रेसचे अतुल पगार, रायुकॉँचे प्रवीण रौंदळ, छावा क्र ांतिवीरचे प्रदीप पगार, भाजपाचे निंबा पगार, मनसेचे
अजय पगार आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Join the Maratha Kranti silent rallies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.