जीएसटी समस्या सोडविण्यासाठी भारती पवार यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:37 IST2021-02-05T05:37:13+5:302021-02-05T05:37:13+5:30

जीएसटी देशभरात लागू होऊन सुमारे साडेतीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. परंतु, या साडेतीन वर्षांत जवळपास दर आठवड्याला जीएसटीच्या नियमात ...

Join Bharti Pawar to solve GST problem | जीएसटी समस्या सोडविण्यासाठी भारती पवार यांना साकडे

जीएसटी समस्या सोडविण्यासाठी भारती पवार यांना साकडे

जीएसटी देशभरात लागू होऊन सुमारे साडेतीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. परंतु, या साडेतीन वर्षांत जवळपास दर आठवड्याला जीएसटीच्या नियमात बदल होत असतात. त्याचा प्रचंड त्रास हा व्यापाऱ्यांना कर सल्लागारांना मोठ्या प्रमाणात होत आहे. ऑनलाईन काम करताना एखादी महत्त्वाची माहितीसुद्धा फॉर्ममध्ये राहू शकते, अशावेळी येणाऱ्या तत्काळ नोटिसा देऊन उत्तर मागितले जाते. फॉर्म अपलोड करताना जीएसटी व इन्कम टॅक्सची साईट जाम होत असते. त्यामुळे कामकाजात अडथळे येतात. अनेक कामांसाठी ओटीपीसाठी फक्त दहा मिनिटांचा अवधी देणे यामुळे खूप धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी उत्तर महाराष्ट्र करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष अनिल चव्हाण व नाशिक कर सल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील देशमुख उपाध्यक्ष निवृत्ती मोरे व सरचिटणीस राजेंद्र बकरे यांनी केली आहे.

छायाचित्र आर फाेटोवर २८ जीएसटी... जीएसटीतील समस्येबाबत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या मागणीसाठी दिंडोरीच्या खा. भारती पवार यांना निवेदन देताना नाशिक कर सल्लागार संघटनेचे अनिल चव्हाण, सुनील देशमुख, निवृत्ती मोरे, राजेंद्र बकरे आदी.

Web Title: Join Bharti Pawar to solve GST problem