दानवेंच्या प्रतिमेला सेनेचे जोडेमार आंदोलन

By Admin | Updated: May 12, 2017 02:13 IST2017-05-12T02:13:04+5:302017-05-12T02:13:14+5:30

नाशिक : तूर खरेदीवरून शेतकऱ्यांविषयी अवमानकारक शब्द वापरल्याबद्दल सेनेने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याला जोडेमार आंदोलन करून घोषणाबाजी केली.

Jodemar movement in the image of demon demon | दानवेंच्या प्रतिमेला सेनेचे जोडेमार आंदोलन

दानवेंच्या प्रतिमेला सेनेचे जोडेमार आंदोलन

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : तूर खरेदीवरून शेतकऱ्यांविषयी अवमानकारक शब्द वापरल्याबद्दल गुरुवारी शिवसेनेने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडेमार आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पुतळा दहनाचा प्रयत्न मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून उधळून लावला.
रावसाहेब दानवे यांनी जालना येथे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज्य शासनाच्या तूर खरेदीवरून शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरल्याने त्या विरुद्ध शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, दानवेंच्या विरोधात सैनिकांना आंदोलनाचे आदेश दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर गुरुवारी शिवसेनेच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसेना कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडेमार आंदोलन केले.

Web Title: Jodemar movement in the image of demon demon