शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या शोधासाठी आला अन् जीव गमावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:22 IST

अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीत कामास असलेल्या चुलतभावाला होत असलेल्या मारहाणीत मध्यस्थी करणाऱ्या भावावर तिघा संशयितांनी धारदार हत्याराने वार केल्याची घटना रविवारी (दि़१) सायंकाळच्या सुमारास प्रिसिजन आॅटो कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर घडली़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या भावाचा उपचारादरम्यान सोमवारी (दि़२) पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला़ दिनेश हिरामण जाधव-माळी (रा़ दोंदवाड, पो़ विंचूर, ता़ जि़ धुळे) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, याप्रकरणी अंबड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, तिघा संशयितांना अटक केली आहे़

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीत कामास असलेल्या चुलतभावाला होत असलेल्या मारहाणीत मध्यस्थी करणाऱ्या भावावर तिघा संशयितांनी धारदार हत्याराने वार केल्याची घटना रविवारी (दि़१) सायंकाळच्या सुमारास प्रिसिजन आॅटो कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर घडली़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या भावाचा उपचारादरम्यान सोमवारी (दि़२) पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला़ दिनेश हिरामण जाधव-माळी (रा़ दोंदवाड, पो़ विंचूर, ता़ जि़ धुळे) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, याप्रकरणी अंबड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, तिघा संशयितांना अटक केली आहे़  पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मूळचा धुळे जिल्ह्यातील रहिवासी योगेश अशोक माळी (२४, रा. भाग्यश्री मेडिकलच्या बाजूला, कारगिल चौक, दत्तनगर, सिडको) हा अंबड औद्योगिक वसाहतीतील बोरोसिल क्लासपॅक कंपनीमध्ये कामास आहे़ संशयित किरण ऊर्फ सोपान वाघ (२२, रा. विल्होळी) हा योगेश माळी याचा कंपनीतील सहकारी असून, या दोघांमध्ये योगेश हा उच्चशिक्षित तर वाघ हा कमी शिकलेला असूनही एकच काम करीत असल्याने त्यांच्यात वाद होते़ कंपनीमध्ये रविवारी (दि़१) दुपारी सव्वा तीन वाजेच्या चहाच्या सुट्टीत संशयित किरण वाघ याने पुन्हा मस्करी केल्याने योगेश माळी याने ताकीदही दिली होती़ त्यावेळी संशयित किरण वाघ याने, तुझ्याकडे पाहतो अशी धमकी दिली.  सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कंपनीतून सुटी झाल्यानंतर योगेश माळी हा प्रिसिजन आॅटो कंपनीतील भूषण भदाणे, समाधान देवरे या मित्रांना तसेच नोकरीच्या चौकशीसाठी धुळ्याहून नाशिकला आलेला चुलतभाऊ दिनेश जाधव यांना भेटण्यासाठी जात होता़ संशयित किरण वाघ व त्याचे दोन सहकारी राकेश लक्ष्मण वाघ (२३) व हिरामण पोपट थोरात (२६, तिघेही राहणार विल्होळी) यांनी योगेशला अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली़ त्यामुळे योगेशने प्रिसिजन कंपनीमध्ये धाव घेऊन मित्रांना तसेच भावास घडलेल्या घटनेची माहिती दिली़ यानंतर दिनेश जाधव व त्याचे मित्र हे मध्यस्थीसाठी कंपनीबाहेर गेले असता दिनेश व संशयितांमध्ये वाद झाले़ यावेळी तिघा संशयितांपैकी दोघांनी दिनेशला पकडून ठेवले तर वाघ याने आपल्या हातातील धारदार हत्याराने दिनेशवर वार केले़कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी आरडाओरड सुरू केल्यानंतर संशयित फरार झाले़ तर गंभीर जखमी झालेल्या दिनेश जाधव यास उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते़ तसेच घटनेची माहिती मिळताच उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक आयुक्त मोहन ठाकूर, अंबडचे पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे, उपनिरीक्षक महेश म्हात्रे हे घटनास्थळी दाखल झाले होते़ दरम्यान, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या दिनेशचा सोमवारी (दि़२) सकाळी मृत्यू झाला़ याप्रकरणी अंबड पोलिसांनी तिघा संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे़भावासाठी घेतली धावनाशिकला चुलतभाऊ कंपनीत कामास असल्याने त्याच्या ओळखीने अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीमध्ये नोकरी शोधण्यासाठी दिनेश जाधव हा धुळ्याचा युवक नाशिकला आला होता़ आपल्या चुलतभावास मारहाण होत असल्याने त्याने मध्यस्थी केल्याने संशयितांनी धारदार शस्त्राने वार केले़ केवळ मध्यस्थीसाठी गेलेल्या दिनेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीतील स्थानिक व परजिल्ह्यातील कामगार यांच्यातील संघर्ष समोर आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा