जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात

By Admin | Updated: August 15, 2014 00:36 IST2014-08-14T21:22:36+5:302014-08-15T00:36:31+5:30

जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात

Jiveshwar Jubilee Celebration | जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात

जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात

 

सिडको : श्री जिव्हेश्वर प्रबोधन मंडळ व साळी समाजाच्या वतीने भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव सिडको येथील ओंकारेश्वर महादेव मंदिर येथे मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात झाला.
प्रकाश दिवाणे यांनी भगवान श्री जिव्हेश्वरांच्या पोथीचे वाचन केले. जयश्री धारणकर, रत्ना गायकवाड, मंगला दिवाणे, उज्ज्वला त्र्यंबके, भारती गुळस्कर, कावेरी झेंड, नंदा ईखे यांनी जिव्हेश्वर पाळणा गायला. नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते व अखिल भारतीय साळी समाजाचे विभागीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळकृष्ण मोरे, जिल्हा स्वकुळ साळी समाजाचे खजिनदार प्रकाश दिवाणे, जिव्हेश्वर प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश त्र्यंबके, खजिनदार देवेंद्र धरम, उपाध्यक्ष सुनील सव्वाशेरे, महेश काटकर, रामभाऊ तांबे, पुंजाराम कढेकर, रामदास ठाणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री भगवान जिव्हेश्वरांची महाआरती करण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Jiveshwar Jubilee Celebration