इगतपुरी पंचायत समितीच्या प्रभारी सभापतिपदी जिजाबाई नाठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 01:17 IST2020-09-18T21:20:30+5:302020-09-19T01:17:46+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी पंचायत समितीच्या प्रभारी सभापतिपदी जिजाबाई नाठे यांची निवड झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या उपस्थितीत या निवडीचे स्वागत करण्यात आले. वाडीव-हे गटाकडे पहिल्यांदाच महिला प्रभारी सभापती म्हणून संधी मिळाल्याने ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.

Jijabai Nathe as the in-charge chairperson of Igatpuri Panchayat Samiti | इगतपुरी पंचायत समितीच्या प्रभारी सभापतिपदी जिजाबाई नाठे

इगतपुरी पंचायत समितीच्या प्रभारी सभापतिपदी निवड झालेल्या जिजाबाई नाठे यांचे स्वागत करताना विजय करंजकर, जया कचरे, विठ्ठल लंगडे आदी.

ठळक मुद्देवाडीव-हे गटाकडे पहिल्यांदाच महिला प्रभारी सभापती म्हणून संधी मिळाल्याने ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.

नांदूरवैद्य : इगतपुरी पंचायत समितीच्या प्रभारी सभापतिपदी जिजाबाई नाठे यांची निवड झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या उपस्थितीत या निवडीचे स्वागत करण्यात आले. वाडीव-हे गटाकडे पहिल्यांदाच महिला प्रभारी सभापती म्हणून संधी मिळाल्याने ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.
सभापती जया कचरे रजेवर जात असल्याने प्रभारी सभापती म्हणून विद्यमान उपसभापती जिजाबाई नाठे यांच्याकडे पदभार देण्यात आला. जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा नयना गावित, जया कचरे, भगवान आडोळे, विठ्ठल लंगडे, सोमनाथ जोशी, अण्णासाहेब पवार, रघुनाथ तोकडे, राजू नाठे, नामदेव गाढवे, नाशिकचे नगरसेवक सुदाम डेमसे, कुलदीप चौधरी, कारभारी नाठे, रंगनाथ कचरे, अंबादास धोंगडे आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Jijabai Nathe as the in-charge chairperson of Igatpuri Panchayat Samiti