पिंपळगाव डुकरा उपसरपंचपदी जिजाबाई कुंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:10 IST2020-08-11T23:13:38+5:302020-08-12T00:10:15+5:30
नांदूरवैद्य : पिंपळगाव डुकरा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जिजाबाई कुंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पिंपळगाव डुकरा उपसरपंचपदी जिजाबाई कुंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदूरवैद्य : पिंपळगाव डुकरा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जिजाबाई कुंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच मालन वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली नांदूरवैद्य येथील उपसरपंच पदाच्या निवडणुकीत आवर्तन पद्धतीने उपसरपंच जिजाबाई भगत यांचे उपसरपंच पद रिक्त झाले होते. निर्धारित वेळेत जिजाबाई कुंदे यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध
निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी नितेश हेबाडे यांनी काम पाहिले. ग्रामपंचायतींच्या सरपंच मालन वाकचौरे, ग्राम अधिकारी नितेश हेबाडे, भाऊसाहेब कडभाने आदींंनी त्यांचा सत्कार करण्यात केला.
(११ पिंपळगाव डुकरा)