उंबरठाणला जेलभरो आंदोलन
By Admin | Updated: June 13, 2017 01:13 IST2017-06-13T01:13:21+5:302017-06-13T01:13:35+5:30
उंबरठाणला जेलभरो आंदोलन आदिवासी शेतकऱ्यांना अटक अन् सुटका

उंबरठाणला जेलभरो आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
सुरगाणा : तालुक्यातील उंबरठाण येथे आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी आमदार जे.पी गावित यांच्या उपस्थित जेलभरो सोमवारी आंदोलन केले. यावेळी आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांची अटक व सुटका करण्यात आली.
३० वर्षापूर्वी वनजमिनीच्या लढ्यात वांगणबारीमध्ये पोलिस वनकर्मचारी यांच्या लढ्यात हुतात्मा झालेले लक्ष्मण बागूल यांच्या हुतात्मा दिनानिमित्ताने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी शेतकरी कसत असलेली शेतजमिन नावावर केल्याशिवाय लढा थांबणार नाही. सातबारावर नाव लावल्याशियाय आदिवासी गप्प बसणार नाही. जमिन न दिल्यास लढा तिव्र करणार असल्याचे यावेळी गावित म्हणाले. आंदोलनात रामजी गावित, सावळीराम पवार, सुभाष चौधरी, चिंतामण गावित, सभापती सुवर्णा गागुर्डे, इद्रजित गावित, काशिराम गायकवाड यांनी सहभाग घेतला. आरोग्यसेविकांच्या मागण्यांबाबत निवेदननाशिक : आरोग्यसेविका व आरोग्य सहायिकांना कालबद्ध पदोन्नती मिळावी या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी येत्या २२ जूनपासून महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष शोभाताई खैरनार यांनी दिली.
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरोग्यसेविका, आरोग्य सहायिका यांचे १२ वर्षे कालबद्ध पदोन्नती प्रस्ताव तत्काळ मंजूर करण्यात यावा, आरोग्यसेविका व आरोगय्य सहायिका यांना २४ वर्षे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा, एकूण १६ आरोग्यसेविकांना पदोन्नतीने आरोग्य सहायिका या पदावर तत्काळ पदोन्नती देण्यात यावी, चार आरोग्य सहायिकांना पदोन्नतीने विस्तार अधिकारी (आरोग्य) या पदावर तत्काळ पदोन्नती देणे आदी मागण्यांचा समावेश आहे. या प्रमुख मागण्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असून, त्या तत्काळ मंजूर करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मागण्या मंजूर न झाल्यास येत्या २२ जूनपासून जिल्हा परिषदेसमोर नर्सेस संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष शोभाताई खैरनार, प्रमिला बेदडे आदींनी दिला आहे.