लासलगावची जान्हवी घनघाव शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात दुसरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 06:13 PM2019-06-25T18:13:30+5:302019-06-25T18:13:46+5:30

लासलगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात लासलगावच्या लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय व जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय यश संपादन केले आहे.

Jhansi Ghanghav Fellowship examination of Lasalgaon district is second in the district | लासलगावची जान्हवी घनघाव शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात दुसरी

लासलगावची जान्हवी घनघाव शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात दुसरी

googlenewsNext
ठळक मुद्देजान्हवी घनघाव या विद्यार्थिनीने जिल्ह्यात दुसरा क्र मांक मिळविला.




लासलगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात लासलगावच्या लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय व जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय यश संपादन केले आहे.
जिल्हा ग्रामीण विभागात सहा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. जान्हवी घनघाव या विद्यार्थिनीने जिल्ह्यात दुसरा क्र मांक मिळविला. त्याचप्रमाणे ऋ तुजा थोरात (९ वी), समर्थ लचके (२१ वा), शंतनु पगार (१०८), कुणाल कदम (२१५), सार्थक काळे (३१३) हे विद्यार्थी शिष्यवत्तीस पात्र ठरले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, पंचायत समिती सदस्य रंजना पाटील, संचालक निता पाटील, शंतनू पाटील, कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील, सीताराम जगताप, लक्ष्मण मापारी, कैलास ठोंबरे, प्राचार्य बाबासाहेब गोसावी, मुख्याध्यापक सुधा आहेर, पर्यवेक्षक संजिवनी पाटील, रोशनी गायकवाड सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना सोनाली वाणी, प्रतिभा डोंगरे, सुर्यकांत गावित, श्रीहरी शिंदे आदींचे मार्गदर्शन लाभले.
(फोटो २५ लासलगाव)

Web Title: Jhansi Ghanghav Fellowship examination of Lasalgaon district is second in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा