शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दागिने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 01:04 IST

गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील कोटंबी घाटात मोटरसायकल स्वारास मारहाण करून वाहनासह भ्रमणध्वनी व दागिने लुटणाऱ्या संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने पकडण्यात पोलिसांना यश आले असून याच टोळीकडून अजून अनेक गुन्ह्यांची उकल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देकोटंबी घाटातील घटना : संशयितास अटक; साथीदारांचा शोध सुरू     

पेठ : गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील कोटंबी घाटात मोटरसायकल स्वारास मारहाण करून वाहनासह भ्रमणध्वनी व दागिने लुटणाऱ्या संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने पकडण्यात पोलिसांना यश आले असून याच टोळीकडून अजून अनेक गुन्ह्यांची उकल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २२ मे रोजी रात्री १० वाजेदरम्यान तालुक्यातील बेहेडमाळ येथील रहिवासी असलेले सोमनाथ गंगाराम जाधव  हे गावाकडे परतत असताना ३ अज्ञात व्यक्तींनी त्यांना मोटर सायकलला धक्का देऊन पाडले.  हातातील दंडुक्याने फटके देऊन जबर जखमी करून त्यांची मोटरसायकल , गळ्यातील  सोन्याचे पान व मोबाईल घेऊन पलायन केले.  मारहाणीत जखमी झालेले जाधव यांना रस्त्यावरून  पेठकडे येणाऱ्या वाहनाने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  त्याची खबर पोलिसांना प्राप्त झाली नसल्याने सदर  गुन्ह्याची नोंद दि. २५ मे रोजी करण्यात आली . वरवर साधारण वाटणाऱ्या या घटनेचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी जिल्हा यंत्रणेकडे मदत मागितली.  मोबाईल २ट्रॅकिंगचा आधार घेऊन तपासाची दिशा ठरवत असता सदरचे गुन्ह्यातील सूत्रधार चोरलेली मोटर सायकल विक्रीसाठी उमराळे ता. दिंडोरी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली.  कोचरगावच्या दिशेकडून येणारी  मोटरसायकल अडवून संशयिताकडे गाडीची कागदपत्रे, लायसन्सची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यावेळी भगवान पांडुरंग टोंगारे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  ताब्यात घेतले असता एका पाठोपाठ लुटीच्या घटनांची कबुली  टोंगारे याने दिली. आता  त्याचे दोन साथीदारही पोलिसांच्या रडारवर आहेत. गुन्ह्यांची व्याप्ती मोठी टोळीने यापूर्वी नाशिक - पेठ मार्गावरील ट्रक चालकांनाही लुटलेले असल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा प्रारंभी तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांचे मार्गदर्शना खाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप वसावे करीत असताना टोळीची व्याप्ती मोठी असल्याची खातरजमा झाल्याने तसा अहवाल वरिष्ठांना देण्यात आला आहे. भगवान टोंगारे यास अटक करून  न्यायालयात हजर केले असता त्यास ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून सदर प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी