शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:33 IST

म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास दिंडोरीरोडवरून भरधाव जाणाऱ्या महिंद्र पीकअप मालवाहू जीपने (एम.एच.१५ एफ.व्ही ७५७९) फिर्यादी रोहित सुभाष दळवी (१९) यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली.

नाशिक : म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास दिंडोरीरोडवरून भरधाव जाणाऱ्या महिंद्र पीकअप मालवाहू जीपने (एम.एच.१५ एफ.व्ही ७५७९) फिर्यादी रोहित सुभाष दळवी (१९) यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात रोहितसोबत दुचाकीवर बसलेला मित्र विशाल गांगुर्डे हा ठार झाला असून, रोहित व प्रतीक देशमुख हे युवक जखमी आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीकअप जीप म्हसरूळ गावाकडून दिंडोरीच्या दिशेने भरधाव जात होती. यावेळी रोहित हा त्याच्या दुचाकीवरून (एम.एच.१५ जीएस ६३३९) मखमलाबाद-म्हसरूळ लिंकरोडने आपल्या मित्रांना घेऊन जात होता.दरम्यान, दिंडोरीरोडवर तारांगण सोसायटीसमोर पीकअप जीपने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत रोहित, प्रतीक हे जखमी झाले तर विशाल हा मृत्युमुखी पडला.  रोहितने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पीकअपचा जीपचालक राजेंद्र केदा गावित (२४,रा. केदारपाडा, सुरगाणा) यास अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक निरीक्षक अहिरे करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू