जयललिता रमणा.न्यू ईराची अक्षता कदम ‘लोकमत हवाई सफर’ची मानकरी

By Admin | Updated: July 5, 2014 00:22 IST2014-07-04T22:23:45+5:302014-07-05T00:22:13+5:30

जयललिता रमणा.न्यू ईराची अक्षता कदम ‘लोकमत हवाई सफर’ची मानकरी

Jayalalitha Ramana. New Iraqi Akatha Kadam honors the 'Lokmat Air Travel' | जयललिता रमणा.न्यू ईराची अक्षता कदम ‘लोकमत हवाई सफर’ची मानकरी

जयललिता रमणा.न्यू ईराची अक्षता कदम ‘लोकमत हवाई सफर’ची मानकरी

नाशिक : हवाई सफरीचे स्वप्न प्रत्येकालाच असते, पण योग येत नाही. तशी संधीही मिळत नाही. लहान वयात विमानात बसण्याची संधी मिळणे तसे नशीबच. पण ‘लोकमत’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणाऱ्या ‘संस्कारांचे मोती’ या उपक्रमाने गोविंदनगर येथील न्यू ईरा स्कूलच्या इ. आठवीच्या अक्षता कदम या विद्यार्थिनीला विमानाने दिल्ली गाठण्याची ‘गुड न्यूज’ दिली आहे. येत्या १० जुलैला ती विमानाने दिल्ली गाठणार आहे.
२०१३ वर्षात संस्कारांचे मोती या उपक्रमावर आधारित ही स्पर्धा घेण्यात आली होती. राज्यभरातून तब्बल २५ लाखांवर विद्यार्थिनींनी यात सहभाग घेतला होता. जवळपास तीन हजार शाळांच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शाळांच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येकी एका विद्यार्थ्याची हवाई सफरीसाठी निवड झाली होती. यात नाशिक जिल्ह्यातून न्यू ईरा स्कूलची अक्षता संजय कदम या विद्यार्थिनीची निवड झाली. ‘लोकमत संस्कारांचे मोती’ उपक्रमातून एकमेव अक्षताची निवड झाल्याने तिचा न्यू ईरा शाळेच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. स्पर्धात्मक परीक्षेच्या अनुषंगाने लोकमतमध्ये सुरू असलेला संस्कारांचे मोती हा उपक्रम प्रेरणादायी असून, चालू सत्रात सुरू असलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सत्कार सोहळ्यात मुख्याध्यापक व मान्यवरांनी केले. न्यू ईरा स्कूलच्या अ‍ॅडव्हायझरी बोर्डच्या चेअरमन सुषमा मोकाशी, मुख्याध्यापक व्ही. उमा पार्वती, जयललिता रमणा, नाशिकच्या श्यामराव विठ्ठल को-आॅपरेटिव्ह बँकेचे संचालक रवि पगारे, मुख्य शाखेचे व्यवस्थापक दिनेश कामत यांसह लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक, वरिष्ठ वितरण व्यवस्थापक पंकेश चंद्रात्रे आदि उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत अक्षताला गौरविण्यात येऊन हवाई सफरीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अक्षताचे आई, वडील, शिक्षकवृंद व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Jayalalitha Ramana. New Iraqi Akatha Kadam honors the 'Lokmat Air Travel'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.