मेशी येथे जवान जाधवला निरोप
By Admin | Updated: June 20, 2014 01:20 IST2014-06-20T00:31:32+5:302014-06-20T01:20:52+5:30
मेशी : फरिदकोट (पंजाब) येथे मृत्यू पावलेला येथील भूमिपुत्र असलेल्या नायक संपत जाधव यांना येथे सैन्यदलातील जवानाकडून मानवंदना देऊन भावपूर्ण निरोप देण्यात आला.

मेशी येथे जवान जाधवला निरोप
मेशी : फरिदकोट (पंजाब) येथे मृत्यू पावलेला येथील भूमिपुत्र असलेल्या नायक संपत जाधव यांना येथे सैन्यदलातील जवानाकडून मानवंदना देऊन भावपूर्ण निरोप देण्यात आला.
फरिदकोट येथे कार्यरत असलेल्या संपत या जवानाचा काल उच्च रक्तदाब वाढल्याने मृत्यू झाला. लष्करातर्फे त्यांचे पार्थिव गावी आणण्यात आले. जाधव यांच्या पत्नी, वडील, आई, भाऊ, भावजय व मित्रमंडळींना यावेळी अश्रू अनावर झाले. नायक संपत जाधव यांचे मातेरेवाडी (ता. चांदवड) येथील सुवर्णा हिच्याशी विवाह झाला. पत्नीला पुढील शिक्षणाची आवड असल्याने संपतने पत्नीला पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत केली व सुवर्णाने चार महिन्यांपूर्वीच शिक्षिका म्हणून सेवेस प्रारंभ केला.
येथील सैन्य दलातील जवानांनी मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कर्नल वाय. व्ही. सुरी, कर्नल एम. मजिद, नायब सुभेदार एस. महापुरे, विकास चव्हाण, सुभेदार सज्जन देशमुख, अशोक यवेले, सुभाष बच्छाव यांच्यासह पोलीस निरीक्षक भाऊसाहेब सातपुते, नायब ए. टी. ठाकरे, डॉ. राहुल अहेर, अशोक बोरसे, केदा शिरसाठ, बापू देवरे, बापू जाधव, साहेबराव सूर्यवंशी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)