जानोरी रस्त्यावरील अनधिकृत भाजीबाजार उठवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 09:29 PM2021-05-09T21:29:41+5:302021-05-10T00:47:10+5:30

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी, दहावा मैल रस्ता येथे काही अनधिकृत भाजीविक्रेते लॉकडाऊनच्या काळात भाजी विक्री करीत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. याबाबत जानोरी ग्रामपंचायत व ओझर नगर परिषद यांनी संयुक्त कारवाई करीत अनधिकृत भाजी विक्रेत्यांना धडक कारवाई करीत उठवून देण्यात आले.

Janori raised an unauthorized vegetable market on the street | जानोरी रस्त्यावरील अनधिकृत भाजीबाजार उठवला

जानोरी दहावा मैल रस्त्यालगत बसणारा भाजी बाजार उठविल्यानंतर जानोरी तलाठी किरण भोये. मोहाडी मंडलाधिकारी राजेंद्र विधाते, जानोरी ग्रामपंचायत व ओझर नगर परिषद कर्मचारी.

Next
ठळक मुद्देभाजी विक्रेत्यांना धडक कारवाई

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी, दहावा मैल रस्ता येथे काही अनधिकृत भाजीविक्रेते लॉकडाऊनच्या काळात भाजी विक्री करीत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. याबाबत जानोरी ग्रामपंचायत व ओझर नगर परिषद यांनी संयुक्त कारवाई करीत अनधिकृत भाजी विक्रेत्यांना धडक कारवाई करीत उठवून देण्यात आले.

जानोरी, दहावा मैल एअरपोर्ट रस्त्यालगत १७ नंबर चारीजवळ ओझर व जानोरी येथील काही भाजीविक्रेते ठाण मांडल्यामुळे येथील नागरिक भाजीपाला खरेदीसाठी या ठिकाणी प्रचंड गर्दी करत असतात. त्यामुळे कोरोनावाढीची शक्यता होती. याबाबत जानोरीचे तलाठी किरण भोये यांनी वेळोवेळी समज देऊनदेखील काही भाजी विक्रेते उठण्यास तयार नव्हते. भोये यांनी याबाबत ओझर नगरपरिषदेकडेही तक्रार केली. अखेर जानोरी ग्रामपंचायत, ओझर नगर परिषद यांनी संयुक्त कारवाई करीत अनधिकृत भाजीवाल्यांना उठवून देण्यात आले. या कारवाईत जानोरी, मोहाडी, ओझर ग्रामपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी यांनी भाग घेतला.
 
Web Title: Janori raised an unauthorized vegetable market on the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.