शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

शेतकºयांची दिशाभूल थांबविण्यासाठी जनजागृती समृद्धी : राज्यस्तरीय बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 1:28 AM

राज्य सरकारकडून समृद्ध महामार्गासाठी जागेचे कोणतेही दर जाहीर न करता शेतकºयांकडून बळजबरीने त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा घाट घातला असून, यात कोणतीही पारदर्शकता नसतांनाही शेतकºयांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. याबाबत मंगळवारी समृद्धी महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दहा जिल्ह्यांच्या प्रतिनिधींची नाशिकमध्ये बैठक घेण्यात आली. यात बुधवारपासून (दि.८) जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समितीचे समन्वयक राजू देसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिडको : राज्य सरकारकडून समृद्ध महामार्गासाठी जागेचे कोणतेही दर जाहीर न करता शेतकºयांकडून बळजबरीने त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा घाट घातला असून, यात कोणतीही पारदर्शकता नसतांनाही शेतकºयांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. याबाबत मंगळवारी समृद्धी महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दहा जिल्ह्यांच्या प्रतिनिधींची नाशिकमध्ये बैठक घेण्यात आली. यात बुधवारपासून (दि.८) जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समितीचे समन्वयक राजू देसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.अश्विननगर येथील मानव सेवा केंद्रात बैठक घेण्यात आली. या बैठकीस समृद्धी महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीचे दहा जिल्ह्यांतील सुमारे ६५ प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत समृद्धी महामार्गाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून, यात येणाºया अडचणींबाबत तसेच नियोजनाबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्यास बहुतांशी शेतकºयांचा विरोध असून, सरकार मात्र शेतकºयांची दिशाभूल करून जमिनी ताब्यात घेण्याचा घाट घालत आहे. २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार ७० टक्के शेतकºयांची संमती असल्याशिवाय जमिनीची खरेदी करू नये असे असतानाही सरकार मात्र सर्व नियम धाब्यावर बसवित जमिनी ताब्यात घेत असल्याबद्दल बैठकीत निषेध नोंदविण्यात आला. जमिनी ताब्यात घेतांना शेतकºयामंध्ये गैरसमज पसरविले जात आहेत. समृद्धी महामार्गासाठी जमिनी ताब्यात घेण्यासाठी सरकारची धडपड सुरु असून पेसा अंतर्गत १९ गावे येत असून समृध्दीला जमीन द्यायची नाही असा ग्रामसभेत एकमताने ठराव करण्यात आला आहे.परंतु यानंतरही तेथील जमिनी खरेदी करण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरु असल्याचेही यावेळी राजू देसले यांनी सांगितले.विशेष म्हणजे याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल असून या सर्व याचिका एकत्र लढविण्यासाठी समितीचे प्रयत्न सुरु आहे त.दुसरीकडे प्रकरण न्यायालयात गेलेले असतांनाही जमिनी खरेदी करण्यात येत असल्याबाबतही बैठकीत निषेध नोंदविण्यात आला.याप्रसंगी सोमनाथ वाघ,शांताराम,ढोकणे,अ‍ॅड.रतनकुमार इचम,भास्कर गुंजाळ,सदानंद वाघमारे,तुकाराम भस्मे,अ‍ॅड.एल.एम,डांगे आदी उपस्थित होते.राज ठाकरेंची भेट घेणारसमिती ही कोणत्याही पक्षाशी निगडीत नसून समृद्धीसाठी जे राजकीय पक्ष सहकार्य करतील त्यांच्याकडेही जाऊन दाद मागणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या दहा नोव्ेंहबर रोजी नाशिक दोैºयावर येत असून समिती प्रतिनिधी याबाबत त्यांची भेट घेणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.