माणुकीचा धर्म पाळण्यासाठी नायगाव खोरे सरसावले जनजागृती : अवयवदानाची नोंदणी करीत जीवन फुलविण्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:47 IST2017-09-01T00:46:28+5:302017-09-01T00:47:13+5:30
माणुसकी माझा मूळ धर्म आहे अशी जीवनाचा अर्थ सांगणारी शपथ सिन्नर तालुक्यातील नायगाव खोºयातील ग्रामस्थांनी घेत शासनाच्या अभिनव अभियानात सहभाग नोंदवला. ग्रामपंचायत परिसरात आयोजित महाअवयवदान महोत्सवानिमित्त अनेकांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केली. दहा जणांनी नावनोंदणी करून माणुसकीचा धर्म पाळण्याची मुहूर्तमेढ रोवली.

माणुकीचा धर्म पाळण्यासाठी नायगाव खोरे सरसावले जनजागृती : अवयवदानाची नोंदणी करीत जीवन फुलविण्याचा संकल्प
नायगाव : माणुसकी माझा मूळ धर्म आहे अशी जीवनाचा अर्थ सांगणारी शपथ सिन्नर तालुक्यातील नायगाव खोºयातील ग्रामस्थांनी घेत शासनाच्या अभिनव अभियानात सहभाग नोंदवला. ग्रामपंचायत परिसरात आयोजित महाअवयवदान महोत्सवानिमित्त अनेकांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केली. दहा जणांनी नावनोंदणी करून माणुसकीचा धर्म पाळण्याची मुहूर्तमेढ रोवली.
रक्तदान हे श्रेष्ठदान म्हणून समाजात सर्वश्रुत आहे. मात्र शासनाने अवयवदान अभियानांतर्गत मंगळवारी सर्वच ग्रामपंचायत कार्यालये व आरोग्य विभागाच्या मदतीने ग्रामीण जनतेत अवयवदानाविषयी जनजागृती करीत ग्रामस्थांना शपथ देत प्रबोधन केले. नायगाव व परिसरातील जायगाव, देशवंडी, जोगलटेंभी, सोनगिरी व ब्राह्मणवाडे या गावांमध्ये माणुसकीचा धर्म पाळत अभियान यशस्वी करण्याची शपथ घेतली. ग्रामीण भागात रक्तदान करण्यासही सहसा लोक धजावत नाही, तेथे अवयवदान करणे ही संकल्पना रुजवणे कठीणच. मात्र, ब्राह्मणवाडेचे उपसरपंच सुनील गिते यांनी स्वत: व पत्नी इंदूबाई यांनीही अवयवदानाचा अर्ज भरून आरोग्यसेवक एस. बी. साबळे यांच्याकडे विशेष ग्रामसभेत सुपूर्द केला. यावेळी आरोग्य सेवक साबळे यांनी माणसाचे अवयव माणूस निर्माण करू शकत नाही. त्यामुळे आपल्या अवयवदानाने एखाद्याचे जीवन फुलू शकते, असे सांगत अवयवदानाच्या गैरसमजाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी गोदा युनियनचे माजी संचालक देवराम दामोधर गिते, रमेश तुकाराम गिते, डॉ. शैला साबळे, सुकदेव एकनाथ गिते व ग्रामपंचायत सदस्य सुनील रामराजे आदींनी अवयवदानासाठी नावनोंदणी करून संपूर्ण नायगाव खोºयात आदर्श निर्माण केला आहे. सरपंच अनिता जेजुरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत महाअवयवदान महोत्सवात उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी मनीषा भालेराव यांनी मार्गदर्शन केले.