जनराज्य आघाडीचे भाजपात विलीनीकरण

By Admin | Updated: August 13, 2014 00:44 IST2014-08-13T00:08:19+5:302014-08-13T00:44:41+5:30

जनराज्य आघाडीचे भाजपात विलीनीकरण

Jana Rajya Alliance BJP's Mergers | जनराज्य आघाडीचे भाजपात विलीनीकरण

जनराज्य आघाडीचे भाजपात विलीनीकरण

नवा पेच : नगरसेवक रिजवान खान मात्र अलिप्तमालेगाव : येथील जनराज्य आघाडीचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले असले तरी मालेगाव महानगरपालिकेतील आघाडीचे एकमेव नगरसेवक प्रा. रिजवान खान यांनी मात्र स्वत:स या कार्यक्रमापासून दूर राखले आहे. तथापि, मनपात आपण जनराज्य आघाडीचे नगरसेवक म्हणूनच कार्यरत राहू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या प्रमुुख उपस्थितीत आज येथील मसगा महाविद्यालयात जनराज्य आघाडीचे नगरसेवक, पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य यांचा रितसर भाजपा प्रवेश झाला. मात्र मालेगाव महानगरपालिकेतील जनराज्य आघाडीच्या तिकीटावर निवडून आलेले एकमेव नगरसेवक प्रा. रिजवान खान मात्र या कार्यक्रमास अनुपस्थित होते.
यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण भाजपात प्रवेश केला नसल्याचे सांगितले. तसेच विभागीय आयुक्त कार्यालयात आपली जनराज्य आघाडीचे नगरसेवक, मनपा गटनेते म्हणून नोंद आहे.
नुकतीच मनपा स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीवरही जनराज्य आघाडीचा नगरसेवक म्हणून निवड व नोंद झालेली आहे. भविष्यातही ती तशीच राहिल असा दावा खान यांनी केला आहे.
एखाद्या पक्षाचे दुसऱ्या पक्षात विलीनीकरण झाल्यानंतर त्या पक्षाचा निर्वाचित सदस्य जुन्या पक्षाचा सदस्य म्हणून राहू शकतो का ? त्याची इतर पदांवरील निवड वैध राहू शकते का? आधीचे पक्षाध्यक्ष संबंधित सदस्याविरुध्द काय भूमिका घेवू शकतात असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. (प्रतिनिधी)
आघार बुद्रुकला
चोरीचा प्रयत्न
मालेगाव : तालुक्यातील आघार बुद्रुक गावी घरात एकटी असलेल्या अपंग महिलेकडून कपाटाची चाबी मांगून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या अनोळखी इसमाविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दिलीप आनंदा वाघ (५६) यांनी फिर्याद दिली. (वार्ताहर)




अधिक तपास हवालदार राजपूत करीत आहेत.

Web Title: Jana Rajya Alliance BJP's Mergers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.