जमियत उलेमाचा कचेरीवर मोर्चा
By Admin | Updated: November 19, 2015 22:03 IST2015-11-19T22:02:09+5:302015-11-19T22:03:41+5:30
मालेगाव : फ्रान्समधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध

जमियत उलेमाचा कचेरीवर मोर्चा
आझादनगर : फ्रान्स येथील पॅरिसमध्ये रविवारी दहशतवादी हल्ला करून १२९ निरपराधांना जीव गमवावा लागून शेकडो जखमी झाले. या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून जमियत उलमा-ए- हिंद शाखा मालेगावतर्फे ज्येष्ठ मौलाना अब्दुल हमीद अझहरी आणि आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला.
दोन वाजता कार्यकर्ते जमा झाले. दुपारी अडीच वाजता ख्वाजा गरीब नवाज अग्निशमन केंद्र आग्रारोड येथून निषेध मोर्चा निघाला. शिवाजीपुतळा, मोसमपूलमार्गे मोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांच्या हातात दहशतवादी हल्ल्याचा निषेध
व्यक्त करणारी फलके होती. मोर्चात आदि कार्यकर्ते सहभागी झाले
होते. यावेळी तहसीलदार
किशोर कोळी यांनी निवेदन स्वीकारले. गेल्या रविवारी फ्रान्सच्या पॅरिसमध्ये आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने अतिरेकी
हल्ले करून १२९ लोकांचा बळी घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर
जगात सर्वत्र निषेध नोंदवला जात आहे.
यावेळी जमियत उलेमाचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती आसिफ अंजूम यांचे भाषण झाले. ते म्हणाले, संपूर्ण जगातून दहशतवाद संपला पाहिजे. दहशतवादाला कोणताही चेहरा, जात धर्म नसतो. त्याचे समूळ उच्चाटन व्हवे. याचवेळी हाफीज अनिस अजहर, आमदार आसिफ शेख, मौलाना आसिफ शाबान, मौलाना अब्दुल हमीद अजहरी, शफीक अल कासमी यांची भाषणे झाली. तहसीलदार कोळी यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी हदीस हाफीज अ. तव्वाफ, अबु रिजवान, मौलाना अब्दुल
हमीद, जमाली, हारुण आशिक
अली, कारी एकलाख अहमद, जनता दलाचे मोहंमद मुस्तकीम यांचेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)