बालनाट्य स्पर्धेत जळगावची बाजी
By Admin | Updated: January 2, 2015 00:40 IST2015-01-02T00:36:55+5:302015-01-02T00:40:20+5:30
निकाल जाहीर : नाशिकचे विद्या प्रबोधिनीचे नाटक द्वितीय

बालनाट्य स्पर्धेत जळगावची बाजी
नाशिक : राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या बाराव्या महाराष्ट्र बालनाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून जळगाव येथील रावसाहेब रूपचंद विद्यालयाच्या ‘सांबरी’ या नाटकाने वीस हजारांचे प्रथम पारितोषिक पटकावले आहे. तर नाशिकच्या विद्या प्रबोधिनी प्रशालेच्या ‘म्या बी शंकर हाय’ या नाटकाला दहा हजार
रुपयांचे द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने हा निकाल जाहीर करण्यात आला. स्पर्धेतील अन्य पारितोषिके अशी : दिग्दर्शन : प्रथम : प्रतिमा याज्ञिक (सांबरी), द्वितीय : सागर रत्नपारखी (म्या बी शंकर हाय), नेपथ्य : प्रथम : कीर्तीकुमार शेलकर (सांबरी), द्वितीय : अमोल खोले (कुंपण), प्रकाशयोजना : प्रथम : प्रफुल्ल दीक्षित (म्या बी शंकर हाय), द्वितीय : श्याम शिंदे, रंगभूषा : प्रथम : प्रभावती बावस्कर (सांबरी), द्वितीय : माणिक कानडे (अदिंबाच्या बेटावर), अभिनय : अजिंक्य साळुंखे (सांबरी), कृष्णा चव्हाण (भिंगरी). (प्रतिनिधी)