जळगाव बु. येथे पोलिसांचा लाठीमार
By Admin | Updated: June 6, 2017 02:46 IST2017-06-06T02:45:54+5:302017-06-06T02:46:03+5:30
नांदगाव : शेतकरी आंदोलनाच्या धुमश्चक्र ीत आज सकाळी जळगाव बु. येथे एका वाहनातील कांदे काढून आंदोलक शेतकऱ्यांनी रस्त्यावर पसरवून टाकले

जळगाव बु. येथे पोलिसांचा लाठीमार
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव : शेतकरी आंदोलनाच्या धुमश्चक्र ीत आज सकाळी जळगाव बु. येथे एका वाहनातील कांदे काढून आंदोलक शेतकऱ्यांनी रस्त्यावर पसरवून टाकले. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी लाठीमार केल्याने चिडलेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांना धकाबुक्की केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत माजी सैनिक आप्पासाहेब सरोदे जखमी झाल्याचे निमित्त झाले. त्यानंतर अल्पावधीत नांदगाव येथे जमलेल्या शेतकऱ्यांच्या जमावाने साडेतीन तास रास्ता रोको केला. सकाळी ११ वा. सरू झालेला रास्ता रोको दुपारी ३.३० वा.पर्यंत सुरू होता. मालेगाव-औरंगाबाद रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून गोंधळ उडाला.
जळगाव बु.चे वृत्त कळाल्यानंतर पिंपरखेड, न्यायडोंगरी, चिंचविहीर आदी गावांमधून शेतकरी नांदगाव येथे दाखल झाले. त्यांनी पोलीस स्टेशनसमोर रास्ता रोको सुरु केला. महाराष्ट्र बंदला पाठिंबा देत नांदगावमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांनी शेतकरी व पोलीस यात यशस्वी मध्यस्थी केल्याने पुढील कटू प्रसंग टळले. नांदगाव येथे आंदोलकांनी पहीली गाडी तहसीलदारांचीच अडवली.
अनेक बसेस, ट्रक व खासगी गाड्यांची गर्दी झाली. आक्र मक भाषणे झाली. त्यात पोलीस खोटे गुन्हे दाखल करणार नाही. जो प्रकार घडला. त्याबद्दल पोलिसांनी माफी मागावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश चव्हाण व तालुकाध्यक्ष अशोक जाधव यांनी केली. माझ्या पक्षासह सगळे पक्ष नालायक आहेत. पोलिसांवर हात टाकला त्याबद्दल माफी मागतो शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करू नका अशी विनंती भाजपचे परसराम सरोदे यांनी करून सर्वांना चिकत केले.
तालुक्यात रास्ता रोको आंदोलन साकोरा, वाखारी येथे, तर भालूर, पिंपरखेड, मांडवड आदी गावांतून बंद पाळण्यात आला.
विलास अहेर, पंचायत समितीचे उपसभापती सुभाष कुटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, नगराध्यक्ष राजेश कवडे, नगरसेवक किरण देवरे, अॅड. अमोल अहेर उपस्थित होते. शेतकऱ्यांतर्फेसंजय जाधव आदींची भाषणे झाली.