जलयुक्त शिवार अभियान यशस्वी
By Admin | Updated: May 8, 2015 23:50 IST2015-05-08T23:08:52+5:302015-05-08T23:50:10+5:30
जलयुक्त शिवार अभियान यशस्वी

जलयुक्त शिवार अभियान यशस्वी
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाची कामे प्रभावीपणे राबवली जात असून, सहा यंत्रणामार्फत कामे राबविली जात आहे. आमदार निर्मला गावित यांनी एकूण १८ गावांची निवड केल्याप्रमाणे देवडोंगरा, तोरंगण, वेळे, देवडोंगरी, भागआहोळ, कळमुस्ते, ब्राह्मणवाडे, गभेशगाव, मुळेवाडी, हिर्डी, खरशित, सामुंडी, टाके दवेगाव, मुरंबी, देवगांव, गावठा व ठाणपाडा या गावांचा समावेश या अभियानात करण्यात आला आहे.
पावसाळ्यात पावसाचे पाणी शिवारात जास्तीत जास्त अडविणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत जास्तीत जास्त वाढ करणे, सिंचन क्षेत्रात वाढ करून शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करण्याची शाश्वती ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनांचे पुनर्जिविकरण करून पाणी पुरवण्यात वाढ करणे, भूजल अधिनियमांची अंमलबजावणी करणे. पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, अस्तित्वात असलेले व निकामी झालेले जलस्तोत्रांची (बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधारे यातील पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे किंवा वाढविणे. अस्तित्वातील जलस्तोत्रांमधील गाळ लोक सहभागातून जलस्तोत्र पाणीसाठा वाढविणे, वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देऊन वृक्ष लागवड करणे, शेतीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करणेस प्रोत्साहन देणे, जनजागृती करणे, पाण्याच्या ताळेबंदाबाबत जनतेत जागृती-जाणीव निर्माण करणे असा या अभियानाचा उद्देश आहे.
तालुक्यातील विविध सहा यंत्रणांची वेगवेगळी कामे सुरू आहेत. त्यापैकी त्र्यंबक तालुक्यात कार्यकारी अभियंता जि.प.ल.पा. पश्चिम कार्यकारी अभियंता लघुसिंचन (स्थानिक स्तर), उपवन संरक्षक (पश्चिम), वनविकास सर्वेक्षण महामंडळ, कृषी विभाग तर उपमुख्य कार्यकारी अभियंता (ग्रामपंचायत) अशा सहा यंत्रणांतर्फे त्यांच्या विभागाशी निगडित कामे सुरू आहेत. कृषी विभागामार्फत मजगीची व नालाबांधची कामे सुरू आहेत. अन्य यंत्रणांची माहिती नाशिक येथील कार्यालयातून मिळेल असे समजले. तथापि, कार्यकारी अभियंता जि. प. ल. पा. पश्चिम यांची १० कामे सुरू असून सात कामे पूर्ण केली आहे.
यासाठी १ कोटी ३५ लक्ष ७८ हजार रुपये खर्च कार्य. अभियंता लघुसिंचन स्थानिक स्तरतर्फे ४ कामे सुरू, २ कामे पूर्ण, उपवन संरक्षक (पश्चिम) ४४ कामे सुरू, ४४ कामे पूर्ण यासाठी १ कोटी ८८ लक्ष ३६ हजार रु. खर्च आला आहे. (वार्ताहर)