जलयुक्त शिवार अभियान
By Admin | Updated: June 1, 2016 00:18 IST2016-05-31T23:48:43+5:302016-06-01T00:18:08+5:30
पिंपळगाव बसवंत : बाजार समितीचा पुढाकार

जलयुक्त शिवार अभियान
पिंपळगाव : महाराष्ट्र शासनाने
हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानात पिंपळगाव बसवंत
कृषी उत्पन्न बाजार समिती सरसावली आहे.
महाराष्ट्रात अग्रेसर असलेली पिंपळगाव बसवंत बाजार समितीची ओळख आहे. शासन राबवित असलेले जलयुक्त शिवार अभियानात बाजार समिती मागे न राहता जलयुक्त शिवार अभियानामध्ये बाजार समिती व स्वर्गीय अशोकराव बनकर पतसंस्था तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहे.
तालुक्यातील भूजल पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी पाण्याचे सिंचन होणे काळाची गरज आहे. याच धर्तीवर भविष्याचा वेध होत बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर व संचालक मंडळाने तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत आजपर्यंत तालुक्यातील लोकसहभागाच्या ठिकाणी नदी, नाले, बंधारे यातील गाळ काढण्याचा झंजावात सुरू केला आहे.
याच धर्तीवर मौजे सुकेणे येथील बाणगंगा नदीपात्रातील गाळ काढण्याचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सर्जेराव मोगल, निवृत्ती धनवटे, प्रतापआप्पा मोगल, निफाड तालुका महिला राष्ट्रवादी कॉँगेसच्या अध्यक्ष अश्विनी मोगल, विलास गडाख, उपसरपंच संतोष काळे, विलास मोगल, राम मोगल, विलास नानासाहेब मोगल, संदेश मोगल, अरुण सांगळे, भूषण धनवटे, बापूसाहेब मोगल, पुंडलिक काळे, राजेंद्र निकम, बाळासाहेब मोगल, वामन अरिंगळे, खंडेराव मोगल, नितीन मोगल, जगन मोगल, बाळासाहेब काळे, नारायण मोगल, विजय मोगल, माधव रहाणे, संग्राममोगल, तुकाराम मोगल, निवृत्ती गायकवाड, सोमनाथ भंडारे, भाऊसाहेब मोगल, मौजे सुकेणे येथील ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)