काळुस्ते येथील भाम धरणाचे जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:19 IST2021-09-04T04:19:07+5:302021-09-04T04:19:07+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्याचा राष्ट्र उभारणीत मोलाचा सहभाग आहे. स्थानिक युवकांना रोजगार व शेतकऱ्यांच्या हितासाठी विशेष अधिवेशन बोलावून येथील ...

काळुस्ते येथील भाम धरणाचे जलपूजन
घोटी : इगतपुरी तालुक्याचा राष्ट्र उभारणीत मोलाचा सहभाग आहे. स्थानिक युवकांना रोजगार व शेतकऱ्यांच्या हितासाठी विशेष अधिवेशन बोलावून येथील मतदारसंघाकरिता विकास निधी खेचून आणला जाईल, असे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केले.
ते भाम धरणाच्या जलपूजनप्रसंगी शुक्रवारी काळुस्ते येथे बोलत होते. तालुक्यातील म्हत्त्वाचे समजले जाणारे भावली धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर दहा दिवसांनंतर उशिरा भावली धरण भरले आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पहिल्यांदाच हे धरण ओसंडून वाहत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. पंतप्रधान सिंचन योजनेतून बांधलेल्या काळुस्ते परिसरातील भाम धरणाचे जलपूजन झिरवाळ व आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रधानमंत्री सिंचन योजनेतून बांधलेले भाम धरण हे सलग तिसऱ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त केले. जवळपास अडीच टीएमसी क्षमतेचे असून, ते यावेळी ओहरफ्लो झाले.
याप्रसंगी नवी मुंबईचे नगरसेवक अरविंद नाईक, माजी आमदार शिवराम झोले, पांडुरंग गांगड, जनार्दन माळी, गोरख बोडके, पांडुरंग शिंदे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, दौलत दुभाषे, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, अरुण गायकर, कमलाकर नाठे, अनिता घारे, पोपट भागडे, मदन कडू, युवक तालुकाध्यक्ष पंकज माळी, ॲड. गणपत चव्हाण, मल्हारी गटकळ, भोलेनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, उपविभागीय अधिकारी अरुण निकम, शाखा अभियंता सुरेश जाचक, केतन पवार, प्रदीप पवार आदींनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
------------------
भाम धरणाच्या पूजनप्रसंगी नरहरी झिरवळ, आमदार हिरामण खोसकर, गोरख बोडके, जनार्दन माळी, अनिता घारे, अरुण गायकर, भोलानाथ चव्हाण व पदाधिकारी. (०३ घोटी भाम)
030921\03nsk_35_03092021_13.jpg
०३ घोटी भाम