जैतापूर अणु प्रकल्प काही वर्षात सुरू होईल - डॉ. अनिल काकोडकर
By Admin | Updated: September 12, 2016 21:52 IST2016-09-12T21:52:53+5:302016-09-12T21:52:53+5:30
कोकणामधील जैतापूरचा रखडलेला अणु उर्जा प्रकल्प येत्या तीन ते चार वर्षांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

जैतापूर अणु प्रकल्प काही वर्षात सुरू होईल - डॉ. अनिल काकोडकर
style="text-align: justify;">ऑनलाईन लोकमत
नाशिक, दि. १२ - कोकणामधील जैतापूरचा रखडलेला अणु उर्जा प्रकल्प येत्या तीन ते चार वर्षांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे, असे मत पदविभूषण व थोर अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित शिक्षक गौरव पुरस्कार सोहळ्याप्रसंगी काकोडकर सपत्नीक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकारांनी त्यांची भेट घेत संवाद साधला.
यावेळी काकोडकर म्हणाले, चार दिवसांपुर्वी उत्तर कोरियाने घेतलेल्या अणु चाचणीपासून भारताला कुठलाही धोका नाही तसेच अणु उर्जेच्याबाबतीत भारत सक्षम असून पाकिस्तानपासून घाबरण्याचेही काही कारण नाही.