जैन सोशल ग्रुप महाराष्ट्राची कार्यकारिणी जाहीर

By Admin | Updated: April 26, 2016 23:57 IST2016-04-26T23:41:04+5:302016-04-26T23:57:44+5:30

पदग्रहण सोहळा : ग्रुप अध्यक्षपदी विजय कोठारी, सचिवपदी सचिन शाह

Jain Social Group Maharashtra's Executive Committee | जैन सोशल ग्रुप महाराष्ट्राची कार्यकारिणी जाहीर

जैन सोशल ग्रुप महाराष्ट्राची कार्यकारिणी जाहीर

नाशिक : जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिजनच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा व पदग्रहण सोहळा नुकताच कालिदास कलामंदिर येथे उत्साहात पार पडला.
या समारंभात बोलताना जैन सोशल ग्रुप्स इंटरनॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष पंकज संघवी यांनी सांगितले की, जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिजन हा भारतातील सर्व विभागात अग्रेसर राहिला आहे. महाराष्ट्र विभागाचे कार्यक्रम उल्लेखनीय आहेत. दोन दिवसीय समारंभात महाराष्ट्र रिजनचा बक्षीस वितरण सोहळा, ज्ञानवर्धन कार्यशाळा व पदग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानवर्धन कार्यशाळेत बालकृष्ण जोशी, ऊर्जा पाटील, राज मुच्छाल, प्रांतिक पाणीग्रही, बिरेन शाह यांनी महाराष्ट्र व कर्नाटकातील ग्रुपच्या ३०० पदाधिकाऱ्यांना ग्रुपच्या कार्यपद्धती, प्रत्येकाची कर्तव्ये, इमेज बिल्डिंग आदि विषयांवर मार्गदर्शन केले. पंकजा बडेरा यांनी सूत्रसंचालन केले. या जैन सोशल गु्रप युवा फोरमला बेस्ट सचिव व जैन सोशल ग्रुप मिडटाऊन ग्रुपला बेस्ट ग्रुपचा पुरस्कार मिळाला. नाशिकचे विजय कोठारी यांनी अध्यक्ष म्हणून व सचिन शाह सचिव म्हणून शपथ घेतली. प्रादेशिक पदाधिकाऱ्यांनीही पदाची शपथ घेतली. नाशिकच्या जयश्री धाडीवाल आणि सरला पटणी यांनी जनसंपर्क म्हणून शपथ घेतली. फेडरेशनचे माजी प्रमुख शरद शाह यांनी पदाची शपथ दिली. प्रमुख पाहुणे म्हणून इंटरनॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष पंकज संघवी, माजी अध्यक्ष शरद शाह, डॉ. रणजित गांधी, फेडरेशनचे प्रमुख सचिव मणिलाल शाह, पीआरओ बिरेन शाह आणि फेडरेशनचे संचालक उपस्थित
होते. (प्रतिनिधी)

Web Title: Jain Social Group Maharashtra's Executive Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.