जैन सोशल ग्रुपतर्फे गुणगौरव सोहळा

By Admin | Updated: July 21, 2016 02:13 IST2016-07-21T02:09:25+5:302016-07-21T02:13:38+5:30

पाल्यांचा गौरव : महाजन यांनी उलगडला सायकल प्रवास

Jain Social Group felicity ceremony | जैन सोशल ग्रुपतर्फे गुणगौरव सोहळा

जैन सोशल ग्रुपतर्फे गुणगौरव सोहळा

 नाशिक : जैन सोशल ग्रुपतर्फे सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सायकलपटू डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. महेंद्र महाजन, डॉ. नेहेते, अंबालाल नहार, सुनील बुरड, शशिकांत पारख, पारस मोदी आदि उपस्थित होते.
डॉ. महाजन यांनी कशाप्रकारे सायकल रेस जिंकली, याची व्हिडीओ क्लीप दाखवली. विजय लोहाडे, संदीप कटारिया यांनी जैन सोशल ग्रुपच्या कामांची माहिती दिली. राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंच्या हस्ते आॅलिम्पिक मशाल फिरवून व ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.
यावेळी मुलांना मोहनलाल बागमार, ललित मोदी, अजय ब्रह्मेचा यांच्या हस्ते बॅट, बॉल, रिंग, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, रोप, पुशबार आदि खेळाचे साहित्य देण्यात आले. प्रारंभी मुलांनी योगासनांद्वारे णमोकार मंत्र सादर केला. त्यानंतर जम्परोप, योगा, लेजीम, आॅलिम्पिक गीत आदिंद्वारे नाशिकच्या आॅलिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी परेश बागरेचा, सचिन गांग, हेमंत दुगड, संतोष मुथा, विनोद कांकरिया, सुमित मंडलेचा, विकिशा ओस्तवाल, साहिल लोहाडे, सुमित मंडलेचा, संतोष मुथा, प्रांजल बागरेचा, चिन्मय देशपांडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Jain Social Group felicity ceremony