शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

जेवणाचे डबे वाटून जैन सोशल ग्रुपने केली महावीर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 8:22 PM

देवळा : देवळा तालुका जैन सोशल ग्रुपच्या वतीने भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून पोलीस कर्मचारी, शेतमजूर व हातावर काम करणाऱ्या लोकांना जेवणाचे डबे वाटप करीत अभिनव पद्धतीने साजरी भगवान महावीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

ठळक मुद्देजेवणाचे डबे तयार करकुन त्याचे वाटप करण्यात आले.

देवळा : देवळा तालुका जैन सोशल ग्रुपच्या वतीने भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून पोलीस कर्मचारी, शेतमजूर व हातावर काम करणाऱ्या लोकांना जेवणाचे डबे वाटप करीत अभिनव पद्धतीने साजरी भगवान महावीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सोशल डिस्टिन्संगचे काटेकोर पालन करण्यात आले. जगभरात करोना विषाणूंच्या संसर्गाने हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्याचे सावट भारतावरही आले आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी भारत सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन केले आहे. संचारबंदी असल्याने पोलीस प्रशासन रस्त्यावर सेवा बजावत असून नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे शेतमजूर, हातावर पोट भरणारे नागरिक यांना रोजगार मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.या लोकांप्रती सामाजिक दायित्व म्हणून भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने होणाºया हजारो रु पयांच्या खर्चाला आळा घालून त्या पैशातून अन्न वाटप करण्याचा निर्णय देवळा तालुका जैन सोशल ग्रुपच्या वतीने घेण्यात आला. यावेळी अण्णाभाऊ साठे नगर, एकलव्य नगर, इंदिरानगर, देवळा पोलीस स्टेशन येथे जेवणाचे डबे तयार करकुन त्याचे वाटप करण्यात आले.यावेळी जैन समाजाचे संघपती जसराज सुराणा, उपनगराध्यक्ष अतुल पवार, पोलीस निरीक्षक सुहास देशमुख, उपनिरीक्षक संजय मातोंडकर, रवींद्र मल्ले, सुराणा पतसंस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष अशोक सुराणा, सचिन सुराणा, अभय संकलेचा, राजू सोनी, राहुल लुंकड, भूषण कर्नावट, रोहित सुराणा, साखरचंद गेलडा, चंदू गेलडा, वैभव ओस्तवाल, अतिश कर्नावट, अनिल गांगुर्डे आदींसह समाज बांधव उपस्थित होते.