जैन साध्वी चारुशीलाजी म. सा. यांचे निधन

By Admin | Updated: July 12, 2014 00:24 IST2014-07-12T00:02:16+5:302014-07-12T00:24:11+5:30

जैन साध्वी चारुशीलाजी म. सा. यांचे निधन

Jain in Sadhvi Charushalaji Bit Passed away | जैन साध्वी चारुशीलाजी म. सा. यांचे निधन

जैन साध्वी चारुशीलाजी म. सा. यांचे निधन

 नाशिकरोड : लॅमरोड वर्धमान महावीर सेवा केंद्रात उपचार घेत असलेल्या जैन साध्वी प. पू. चारूशीलाजी म. सा. (६५) यांचे शुक्रवारी संथाराव्रतात निधन झाले. श्रमनसंघ आचार्य श्री आनंदऋषीजी म. सा व प.पू.उज्ज्वलकुवरजी महासती यांच्या त्या सुशिष्य होत्या.
मूळच्या पाचोरा येथील श्रीमती बदामबाई व लुनकरण पारख यांच्या कन्या असलेल्या प.पू. चारूशीलाजी म.सा. यांनी वयाच्या २०व्या वर्षी १९६९ मध्ये मुंबईत दीक्षा घेतली. त्यांना अर्धांगवायुचा झटका आल्याने १९९५ पासून त्यांच्यावर लॅमरोड येथील वर्धमान महावीर सेवा केंद्रात उपचार सुरू होते. राष्ट्रसंत प.पू. नम्रमुनीजी व प.पू.गौतममुनीजी आदि साधू साध्वींचे सानिध्य त्यांना लाभले. शुक्रवारी दुपारी त्यांनी गुरूभगिनी प.पू. भव्यसाधनाजी यांच्याकडून संथारा व्रत स्वीकारले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर उद्या (दि. १२) रोजी सकाळी १० वाजता नाशिकरोड विहितगाव वालदेवी तीरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जैन साधू-संत व समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Jain in Sadhvi Charushalaji Bit Passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.