जैन मंदिराचा महोत्सव उत्साहात
By Admin | Updated: May 21, 2014 01:03 IST2014-05-21T01:03:35+5:302014-05-21T01:03:35+5:30
श्री मुनीसुव्रतस्वामी जैन मंदिराचा १५ वा वर्धापन व ध्वजारोहण महोत्सव उत्साहात संपन्न

जैन मंदिराचा महोत्सव उत्साहात
जैन मंदिराचा महोत्सव उत्साहातनाशिकरोड : आर्टिलरी सेंटररोड येथे जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री मुनीसुव्रतस्वामी जैन मंदिराचा १५ वा वर्धापन व ध्वजारोहण महोत्सव उत्साहात संपन्न झाला. मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त गेल्या तीन दिवसांपासून श्री धर्मरत्न विजमुनी व श्री कीर्ती विजयमुनीजींचे व्याख्यान संपन्न झाले. वर्धापन दिनानिमित्त आज परिसरातून सकाळी शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर मंदिरात धार्मिक पूजा, भजन आदि कार्यक्रम पार पडले. दुपारी गिरीश शाह यांच्या हस्ते मंदिरावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी संघपती कन्हैयालाल कर्नावट, पृथ्वीराज बोरा, नितीन कर्नावट, संदीप कर्नावट, रोनक शाह, संजय लुणावत, चेतन बोरा, डॉ. पी. एफ. ठोळे, सुरेश घिया, सतीश धाडीवाल, प्रवीण लोढा, सुनील बेदमुथा, महेंद्र धाडीवाल, अशोक चोरडीया, डॉ. राजेंद्र मंडलेचा आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)